वाजिदने शेवटचं गाणंही सलमानसाठीच केलं कम्पोज - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, June 1, 2020

वाजिदने शेवटचं गाणंही सलमानसाठीच केलं कम्पोज

https://ift.tt/3eDGbcB
मुंबई- बॉलिवूडमधील सध्याच्या आघाडीच्या संगीतकार जोड्यांपैकी एक असलेल्या साजिद-वाजिद जोडीतील यांचे मुंबईतील चेंबूर येथील रुग्णालयात निधन झाले आहे. ते ४२ वर्षांचे होते. काही महिन्यांपूर्वी त्यांची किडनी ट्रान्सप्लान्ट करण्यात आली होती. रोगप्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे डॉक्टर वाजिद यांना बचावू शकले नाहीत. भाई- भाई गाण्याला दिलं होतं वाजिद खान यांनी संगीत- वाजिद खान यांच्या आकस्मित निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केलं. वाजिद खान आणि फार चांगले मित्र होते. त्यांनी सलमानच्या अनेक सिनेमांना संगीत दिलं होतं. विशेष म्हणजे त्यांनी शेवटचं संगीतही सलमानच्याच गाण्याला दिलं. ईदच्या मुहूर्तावर सलमानने त्याचं 'भाई- भाई' गाणं प्रदर्शित केलं होतं. या गाण्याला साजिद- वाजिदने संगीत दिलं होतं. हिंदू- मुस्लिम भाऊ असल्याचा संदेश या गाण्यातून देण्यात आला होता. सलमानने हे गाणं त्याच्या फार्महाउसवर शूट केलं होतं. संगीत दिग्दर्शक साजिद- वाजिद या जोडीने सलमान खानच्या अनेक सिनेमांसाठी संगीत दिलं. दोघांनी आपल्या करिअरची सुरुवात १९९८ मध्ये आलेल्या प्यार किया तो डरना क्या सिनेमापासून केली. यानंतर या जोडीने मागे वळून पाहिलं नाही. एकाहून एक हिट गाणी यांनी बॉलिवूडला दिली.