
कोलकाता: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या निवृत्तीबद्दल सोशल मीडियावर चर्चा होत असतात. गेल्याच आठवड्यात धोनीच्या निवृत्तीसंदर्भातील हॅशटॅग चर्चात आला. अनेकांना धोनीने खरच निवृत्ती घेतल्याचे वाटले. पण धोनीची पत्नी साक्षीने निवृत्तीसंदर्भातील वृत्त चूकीचे असल्याचे सांगितले आणि चर्चा थांबली. वाचा- भारतीय संघातून मोठ्या कालावधीसाठी बाहेर असेलल्या धोनीच्या भविष्यासंदर्भात नेहमची चर्चा केली जाते. सोशल मीडियावर होणाऱ्या धोनीच्या निवृत्तीसंदर्भातील बातम्यांवर साक्षीने आश्चर्य व्यक्त करत अशा बातम्या कोठून येतात अशा प्रश्न केला. तसेच धोनीची नजर पुन्हा एकदा भारतीय संघाकडून खेळण्याची असल्याचे संकेत साक्षीने दिले आहेत. धोनीने गेल्या वर्षी आयसीसी वर्ल्ड कपमधील न्यूझीलंडविरुद्ध झालेली सेमीफायनलची लढत खेळली होती. त्या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि वर्ल्ड कपमधून टीम इंडिया बाहेर पडली. वाचा- वर्ल्ड कपनंतर धोनीने काही काळ विश्रांती घेण्याचे ठरवले होते. बीसीसीआयने खेळाडूंच्या करारातून धोनीला वगळले, त्यामुळे खरच धोनी निवृत्ती घेईल अशी चर्चा होती. पण धोनीने आयपीएलचा १३वा हंगाम खेळून भारतीय संघात येणार असल्याचे संकेत दिले. मात्र करोना व्हायरसमुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली. वाचा- चेन्नई सुपर किंग्जच्या इस्टाग्राम लाइव्ह चॅट साक्षी म्हणाली, धोनी लो प्रोफाइल राहतो. लॉकडाऊनमुळे तर तो सोशल मीडियापासून दूरच आहे. मला कळच नाही या बातम्या (धोनीच्या निवृत्तीसंदर्भात) येतात कोठून. मला खरच कल्पना नाही. वाचा- तुम्ही सोशल मीडियावर असात तेव्हा या सारख्या गोष्टींना तयार व्हावे लागते. लोकांची स्वत:ची मते आहेत. जेव्हा धोनीने निवृत्ती घेतली हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये होता तेव्हा मला अनेक फोन आणि एसएमएस येत होते, असे साक्षी म्हणाली. वाचा- आम्ही सीएसकेला खुप मिस करतोय. आयपीएल होईल की नाही माहित नाही. माझी मुलगी देखील विचारत असते की आयपीएल कधी होईल. जर क्रिकेट झालेच नाही तर आम्ही उत्तराखंडमधील डोगराळ भागात फिरायला जाणार आहोत. वाचा- ... तुम्हा सर्वांना माहितच आहे की माही कसा आहे. तो इस्टा लाइव्ह बोलत नाही. मला कल्पना आहे की चाहते त्याच्यासाठी वेडे आहेत. पण तो सोशल मीडियावर लो प्रोफाइल आहे, असे साक्षीने सांगितले.