वाचा: आजच्या ठळक बातम्या अगदी मोजक्या शब्दांत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, June 29, 2020

वाचा: आजच्या ठळक बातम्या अगदी मोजक्या शब्दांत

https://ift.tt/3eFWNks
मुंबई : देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. रविवारी एक दिवस इंधन दरवाढीला ब्रेक लागला होता. मात्र आज पुन्हा सोमवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले आहे. इंधन दरवाढीविरोधात आज काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईः मुंबईत अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना पश्चिम रेल्वेने दिलासा दिला आहे. पश्चिम रेल्वेने उद्यापासून लोकलच्या ४० फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना घरी जाण्यास आणि कामावार जाण्यास अधिक सोयीचं होणार आहे. भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा विरोध केल्याने पक्षातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. बाळासाहेब थोरात यांनी यावर संयत प्रतिक्रिया दिली आहे, मात्र भाजप अडचणीत आला की पवार मदतीला कसे काय धावून जातात, असा प्रश्न काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत अनेकजण विचारत आहेत.