... म्हणून नरेंद्र मोदी चीनमध्ये लोकप्रिय झाले; चव्हाणांची खोचक टीका - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, June 27, 2020

... म्हणून नरेंद्र मोदी चीनमध्ये लोकप्रिय झाले; चव्हाणांची खोचक टीका

https://ift.tt/3dAJOiE
मुंबई: पंतप्रधान चीनबाबत सतत बोलत आहेत. त्यामुळे ते चीनमध्ये लोकप्रिय ठरले आहेत, अशी खोचक टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते यांनी केली आहे. चीनने भारतीय भूभागात घुसखोरी केली नसल्याचं वक्तव्य मोदींनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे भारतीय जवानांचं मनोबल ढासळलं असल्याची टीकाही त्यांनी केली. ( attack on ) भारत-चीन सीमेवर चिनी सैनिक आणि भारतीय जवानांमध्ये झालेल्या झटापटीत २० भारतीय जवान शहीद झाले. त्यानंतर घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या हद्दीत चीनने घुसखोरी केली नाही. भारताच्या कोणत्याही चौकीवर चीनने ताबा मिळविलेला नाही, असं स्पष्ट केलं होतं. गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांबरोबर झालेल्या झटापटीवर आम्हाला चिंता आहे आणि सीमेवर तैनात असलेल्या जवानांप्रती आम्हाला अभिमानही आहे, असं मोदींनी म्हटलं होतं. तर सीमेचं रक्षण करणं आणि घुसखोरी रोखणं ही सरकारची प्रमुख जबाबदारी आहे. काँग्रेसने हा मुद्दा सातत्याने उचलून धरला. पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याचं चव्हाण म्हणाले. गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीबाबत केंद्र सरकारमध्येच वेगवेगळी मते आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने नियंत्रण रेषेवर चिनी सैनिकांनी तळ ठोकल्याचं आणि चिनी सैनिकांनी नियंत्रण रेषेवर कारवाया सुरू केल्याचं मान्य केलं आहे. मात्र, सर्व पक्षीय बैठकीत मोदींनी नियंत्रण रेषेवर कोणतीच घुसखोरी झाली नसल्याचं म्हटलं आहे, याकडेही चव्हाण यांनी लक्ष वेधले आहे.