'सीमावादावर नक्की खरं कोण बोलतंय? भारताचे राजदूत की पंतप्रधान?' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, June 27, 2020

'सीमावादावर नक्की खरं कोण बोलतंय? भारताचे राजदूत की पंतप्रधान?'

https://ift.tt/31xZ2Th
ठाणे: भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षावरून देशात राजकारण प्रचंड तापले आहे. पंतप्रधान यांनी सर्वपक्षीय बैठकीत यावर खुलासा केल्यानंतरही विरोधकांचे समाधान झालेले नाही. चीनच्या घुसखोरीविषयी आणि शहीद जवानांबद्दल केंद्र सरकारवर प्रश्नांची सरबत्ती सुरूच आहे. आणखी वाचा: भारतीय सैन्य देशाच्या सार्वभौमत्व जपण्यास सक्षम आहे. चीननं भारताची एक इंचही जमीन बळकावलेली नाही. भारतीय भूभागावर कुणीही घुसखोर नाहीत, असं पंतप्रधान मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत स्पष्ट केलं होतं. मात्र, काँग्रेसनं पंतप्रधानांच्या या खुलाशाला आक्षेप घेतला आहे. चीननं घुसखोरी केली नसेल तर भारताचे २० जवान शहीद कसे झाले, असा प्रश्न काँग्रेस नेते यांनी पंतप्रधान मोदी यांना केला होता. त्यावरून भाजप-काँग्रेसमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आणखी वाचा: राष्ट्रवादीचे नेते यांनीही याबाबत एक ट्विट केलं आहे. भारताच्या चीनमधील राजदूतांच्या वक्तव्याचा हवाला देत आव्हाड यांनी एक प्रश्न उपस्थित केलाय. आपल्या ट्विटमध्ये आव्हाड म्हणतात, 'नियंत्रण रेषेवरील परिस्थिती सुधारावी असं वाटत असेल तर चीनने वेळोवेळी घुसखोरी करून तेथे नवीन पायाभूत सुविधा उभारण्याचे बंद करावे, असं भारताचे चीनमधील राजदूत विक्रम मिस्री यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी सीमावादावर केलेल्या भाषणात नेमकी उलट माहिती दिली आहे. मग खरं कोण बोलतंय? राजदूत की पंतप्रधान?' सीमावादावरून केंद्र सरकारला प्रश्न विचारणाऱ्या काँग्रेसला चीनकडून पैसे मिळत असल्याचा आरोप भाजपनं केला आहे. राजीव गांधी फाऊंडेशनला दिल्लीतील चिनी वकिलातीकडून घसघशीत देणगी मिळाल्याचं भाजपनं म्हटलं आहे. या वादात उडी घेत शिवसेनेनं भाजपवर टीका केली आहे. 'केवळ काँग्रेसच नव्हे तर आपल्या देशातील अनेक राजकीय पक्ष व पुढारी हे परराष्ट्रांचे लाभार्थी आहेत. भाजपनं तर यावर बोलणं म्हणजे चिखलात दगड मारून स्वतःच्या अंगावर शिंतोडे उडवून घेण्यासारखे आहे. हमाम मे सब नंगेच आहेत. भाजपला काँग्रेस पक्षाशी नंतर कधीही लढता येईल. पण आज चीनशी लढायचे आहे. त्यावर काय ते बोला,' असा खोचक टोलाही शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपला हाणला आहे.