या कंपनीसाठी करोना ठरले वरदान; उत्पन्न झाले दुप्पट! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, June 4, 2020

या कंपनीसाठी करोना ठरले वरदान; उत्पन्न झाले दुप्पट!

https://ift.tt/3eQSPFo
नवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे जवळपास सर्वच कंपन्यांना आर्थिक फटका बसला आहे. पगार आणि कर्मचारी कपातीसारखे कठोर निर्णय घ्यावे लागत असताना एक कंपनी अशी आहे ज्यांना करोना संकट वरदान ठरले. होय जगभरातील लाखो जणांचा बळी घेणारा या व्हायरसमुळे एका कंपनीचे उत्पन्न दुप्पट झाले आहे. वाचा- करोनाची लागण रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. ज्या लोकांना घरातून काम करणे शक्य होते त्यांनी ऑनलाइन काम सुरू केले. अशात सर्वात महत्त्वाचे ठरले. ऑनलाइन मिटिंग, अभ्यास, मित्र आणि कुटुंबातील व्यक्तींशी बोलण्यासाठी व्हिडिओ कॉलचा वापर सर्वाधिक झाला. यासंदर्भात काम करणाऱ्या कंपनीचा व्यवसाय करोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढला. गेल्या काही दिवसात अनेकांनी वापरलेल्या (Zoom App) या व्हिडिओ सेवा देणाऱ्या कंपनीच्या पहिल्या तिमाहीतील उत्पन्न दुप्पट झाले आहे. करोनाच्याआधी झूमचा समावेश लोकप्रिय कंपन्यांच्या यादीत नव्हता. पण करोनामुळे त्याचा वापर वाढला आणि त्याची लोकप्रियता वाढली. वाचा- मंगळवारी कंपनीने फेब्रुवारी-एप्रिल या कालावधीचे निकाल जाहीर केले. झूमच्या वर्षातील पहिल्या तिमाहीतील उत्पन्न दुप्पट होत ते ३२.८ कोटी डॉलरवर पोहोचले. यामुळे कंपनीचा नफा २.७ कोटी डॉलरवर पोहोचला असून जो त्याआधीच्या तिमाहीत १ लाख ९८ हजार डॉलर इतका होता. इतक नाही तर वॉल स्ट्रीटवर कंपनीच्या शेअरचे भाव तिप्पट झालेत. वाचा- झूमने मंगळवारी निकाल जाहीर केल्यानंतर कंपनीच्या शेअर्सचे भाव वाढले. जर बुधवारी बाजारात तेजी राहिली तर एका शेअरचा भाव २०० डॉलरच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. हा भाव १४ महिन्यांपूर्वी बाजारात आलेल्या सुरूवातीच्या ३६ डॉलरच्या तुलनेत अधिक असेल. कंपनीचे बाजार मुल्य ५९ अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. वाचा- कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक युआन म्हणाले की, व्हिडिओ कम्युनिकेशन ही एक मुख्य सेवा होणार आहे. व्यवसाय वाढी बरोबरच चालू तिमाहीत (मे-जुलै) ५० कोटी डॉलर उत्पन्न होण्याचा अंदाज असून जो कंपनीच्या गेल्या आर्थिक वर्षातील कोणत्याही तिमाहीपेक्षा ४ पट अधिक असेल. एरिक यांनी ९ वर्षापूर्वी ही कंपनी स्थापन केले होती. ते कंपनीचे एक सह-संस्थापक आहेत. झूम व्हिडिओ सेवेच्या गुणवत्तेबद्दल आणि सुरक्षेसंदर्भात तक्रारी आणि अडचणी येत असून सुद्धा व्यवसायात वाढ होत आहे.