औरंगाबादमध्ये करोनाची दहशत कायम; मृतांचा आकडा ८९ वर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, June 4, 2020

औरंगाबादमध्ये करोनाची दहशत कायम; मृतांचा आकडा ८९ वर

https://ift.tt/3dB5HPy
औरंगाबाद: जिल्ह्यात आणखी ६३ बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण करोना बाधितांची संख्या १७६७ झाली आहे. तसेच समता नगरातील ४३ वर्षीय करोना बाधित पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात बुधवारी सायंकाळी मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील करोना बाधितांच्या मृत्यूची संख्या ८९ झाली आहे, तर आतापर्यंत १११३ करोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत व सध्या यापैकी ५६५ बाधितांवर उपचार सुरू आहे. नव्याने आढळलेल्या बाधितांमध्ये बेगमपुरा येथील २, लेबर कॉलनी १, पडेगाव १, बायजीपुरा १,हर्सूल परिसर १, भारतमाता नगर १, संजय नगर, मुकुंदवाडी १, रोशन गेट २, देवळाई चौक परिसर १, समर्थ नगर १, शिवशंकर कॉलनी ५, शिवाजी कॉलनी १, सईदा कॉलनी १, चेतना नगर २, एन-सात सिडको १, एन-दोन, विठ्ठल नगर १, विनायक नगर, जवाहर कॉलनी १, बारी कॉलनी १, हनुमान नगर, गारखेडा १, मिलकॉर्नर १, एन-चार १, क्रांती नगर १, विजय नगर, गारखेडा १, एन-सहा, संभाजी कॉलनी ६, अयोध्या नगर १, न्यू हनुमान नगर १, कैलास नगर १, अजिंक्य नगर, गारखेडा ३, एन-एक १, सिडको १, सुंदर नगर, पडेगाव १, गणेश कॉलनी २, एन-चार , समृद्धी नगर, सिडको २, कटकट गेट, नेहरू नगर १, आंबेडकर नगर, एन-सात ३, जय भवानी नगर १, राजा बाजार ४, अन्य ठिकाणच्या ६ रहिवाशांचा समावेश आहे. यामध्ये २६ महिला आणि ३७ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. खासगी रुग्णालयात एका बाधिताचा मृत्यू शहरातील समता नगर येथील ४३ वर्षीय करोना बाधित पुरुष रुग्णाचा बुधवारी (तीन जून) सायंकाळी सहा वाजता एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत ७०, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण १८ व जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये एका करोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात आतापर्यंत ८९ करोना बाधितांनी आपला जीव गमावला आहे.