पंपोरच्या मशिदीत घुसलेले दोन्ही दहशतवादी ठार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, June 19, 2020

पंपोरच्या मशिदीत घुसलेले दोन्ही दहशतवादी ठार

https://ift.tt/3d9WgWg
अवंतीपोरा : जम्मू काश्मीरच्या अवंतीपोराच्या भागात बुधवारी रात्री पुन्हा एकदा दहशतवाद्यांविरोधात चकमकीला सुरूवात झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, इथे दहशतवाद्यांनी लपण्यासाठी एका मशिदीचा आसरा घेतला होता. ही चकमक शुक्रवार सकाळपर्यंत सुरू होती. गुरुवारी रात्री एक घालण्यात सुरक्षा दलाला यश मिळालं. तर शुक्रवारी सकाळी एन्काऊंटरमध्ये दोन्ही झालेत. दुसरीकडे शोपियाँच्या मुनांदमध्येही गुरुवारी एका दहशवाद्याला सुरक्षा दलानं टिपलं. मुनांदमध्ये अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे. अवंतीपोरा भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाच्या हाती लागली होती. त्यानंतर सुरक्षा दलानं सर्च ऑपरेशन राबवलं. या दरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबाराला सुरूवात केली. सुरक्षा दलानं एका दहशतवाद्याला ठार केलं परंतु, दोन दहशतवादी स्थानिक जामा मशिदीत घुसले. वाचा : वाचा : वाचा : वाचा : सुरक्षा दलानं दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितलं परंतु, ते शरण आले नाहीत. शुक्रवारी सकाळी स्पेशल ऑपरेशन ग्रुपचे (SOG) कमाडो मशिदीत घुसले आणि दोन्ही दहशतवाद्यांना ठार केलं. उल्लेखनीय म्हणजे यावेळी सुरक्षादलाकडून गोळीबार किंवा आयईडीचा वापर केला नाही. दहशतवाद्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आलाय. दुसरीकडे, शोपियाँच्या भागात सुरक्षादलानं सर्च ऑपरेशन सुरू केलंय. इथे गुरुवारी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला होता. सुरक्षादलाच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी आणखी काही दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसराला वेढा घालण्यात आलाय. सुरक्षा दलाकडून गेल्या दोन आठवड्यांत १५ हून अधिक दहशतवादी ठार करण्यात आलेत. तर या वर्षात सुरक्षा दलानं १०० हून अधिक दहशतवाद्यांना टिपलंय. सुरक्षा दलाच्या म्हणण्यानुसार, उत्तर काश्मीरला दहशतवाद्यांच्या तावडीतून सोडवण्यावर त्यांचा भर होता. वाचा : वाचा : वाचा : वाचा :