अभिनेता म्हणाला रजनीकांत करोना पॉझिटिव्ह आणि.. - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, June 5, 2020

अभिनेता म्हणाला रजनीकांत करोना पॉझिटिव्ह आणि..

https://ift.tt/2Y1hiRr
मुंबई- देशभरात सुपरस्टार रजनिकांत यांची लोकप्रियता किती आहे हे काही वेगळं सांगायला नको. त्यांच्याविरोधात कोणीही काही लिहिलं की जगभरातील रजनीकांत यांचे चाहते त्यांना ट्रोल करतात. आताही काहीसं असंच झालं. अभिनेता रोहित रॉयने रजनीकांत यांच्या नावाचा उल्लेख असलेला एक जोक शेअर केला. यानंतर सोशल मीडियावर रोहितला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. रोहितने सोशल मीडियावर जोक शेअर करत लिहिलं की, 'रजनीकांत करोना पॉझिटिव्ह आहे आणि आता करोनाला क्वारन्टीन करण्यात आलं आहे.' रोहितचा हेतू वातावरण हलकं- फुलकं करणं हाच होता पण रजनीकांत यांच्या अनेक चाहत्यांना रोहितचा हा जोक असंवेदनशील वाटला. यानंतर रोहितला ट्रोल करण्यात आलं. रोहितनेही दिली प्रतिक्रिया- यानंतर रोहितने प्रतिक्रिया देत म्हटलं की, 'मित्रांनो थोडा आराम करा. तुम्ही आयुष्यात एवढंही उदास होऊ नका. एक जोक हा शेवटी जोकच असतो. मला नाही वाटतं यामध्ये कोणाविरुद्ध काही बोललं गेलं आहे. हा रजनीकांत सर स्टाइल जोक होता आणि मी या जोकच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना हसवण्याचा प्रयत्न करत होतो. कमेन्ट करण्याआधी समोरच्या व्यक्तीचा हेतूही जाणून घेतला पाहिजे. कमीत कमी मी ही पोस्ट तुम्हाला दुखावण्यासाठी पाठवली नव्हती. पण तुम्ही जाणीवपूर्वक मला दुखावण्यासाठी असे द्वेषाचे मेसेज पाठवत आहात.'