भारत प्रत्यार्पणावर पळपुटा विजय माल्ल्या म्हणतो... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, June 4, 2020

भारत प्रत्यार्पणावर पळपुटा विजय माल्ल्या म्हणतो...

https://ift.tt/2Y1B5zZ
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून पळपुट्या व्यावसायिक याला भारतात आणण्याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. लवकरच त्याला भारतात आणलं जाईल, असं मीडियातून सांगितलं जात असलं तरी 'किंगफिशर'चा मालक असलेल्या विजय माल्ल्यानं या बातम्या केवळ असल्याचं म्हटलंय. माल्ल्याला घेऊन अधिकारी लवकरच भारतात दाखल होऊ शकतात... त्याला आर्थर रोड तुरुंगात ठेवलं जाणार... सीबीआय आणि ईडीचे अधिकारी त्याला घेऊन येणार... या आणि अशा कित्येक गोष्टी मीडियात चघळल्या जात असल्या तरी विजय माल्ल्याच्या खासगी सहाय्यकानं या गोष्टींना नकार दिलाय. 'टाईम्स ऑफ इंडिया'नं बुधवारी माल्ल्याच्या खासगी सहाय्यकाशी संवाद साधला. तेव्हा माल्ल्याला भारतात आणणार असल्याबद्दल आपल्याकडे कोणतीही माहिती नाही, असं सांगितलं. तसंच लंडन स्थित भारतीय उच्चायोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही माल्ल्याला आत्ताच भारतात आणलं जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. बंद पडलेल्या ''चा मालक विजय माल्ल्यावर देशातील १७ बँकांचं ९ हजार कोटींची आहे. तो २ मार्च २०१६ रोजी भारत सोडून ब्रिटनला पळून गेला होता. ब्रिटनच्या न्यायालयानं १४ मे रोजी माल्ल्याच्या दिलीय. त्यानंतर नियमानुसार, निकालाच्या २८ दिवसांच्या आत भारत सरकारला माल्ल्या भारतात आणावं लागेल. अशा वेळी आता २० दिवस उलटून गेले आहेत. प्रत्यार्पणाची सगळी कायदेशीर प्रक्रियाही पार पडलेली आहे. त्यामुळे, माल्ल्याला कधीही अधिकारी भारतात आणू शकतात. परंतु, नेमकं कधी याची अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.