
राज्यात पुन्हा एकदा होणार नाही तर आता ' 'च असेल, असे स्पष्टीकरण देत शुक्रवारी आरोग्य मंत्री यांनी पुन्हा लॉकडाउन होणार असल्याच्या चर्चेवर पडदा टाकला. करोनाची लस येत नाही तोवर राज्यातील जनतेला सुरक्षित वावर, मास्क आणि सॅनिटायजेशन या 'एसएमएस' प्रणालीचा अवलंब करूनच साधारण आयुष्य जगावे लागेल, असे त्यांनी सांगितले. राज्यात करोनाच्या चाचण्या हव्या त्या प्रमाणात होत नाहीत आणि मृत्यूदर लपवला जातो, असे आरोप खोडून काढत त्यांनी चाचण्यांच्या आकडेवारीसह स्पष्टीकरण दिले. : भारतीय हवामान विभागाने देशभरात पोहोचल्याचे शुक्रवारी जाहीर केले. देशभरात मान्सून पोहोचला तरी महाराष्ट्रात मात्र पावसाचा प्रवास काहीसा रखडलेला आहे. मुंबई देखील पहिल्या पावसाच्या जोरदार सरींनंतर कोरडीच आहे. मुंबई: रुग्णालयात करोनामुळे झालेल्या मृत्यूंची माहिती महापालिकेला देण्यासाठी खासगी रुग्णालयांना अंतिम संधी देण्यात आली आहे. २९ जून रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत माहिती न कळविल्यास साथरोग नियंत्रण कायदा १८९७ अन्वये कठोर कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.