वादळानंतर CM ठाकरे थेट फिल्डवर; रायगडला मिळणार मोठा दिलासा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, June 5, 2020

वादळानंतर CM ठाकरे थेट फिल्डवर; रायगडला मिळणार मोठा दिलासा

https://ift.tt/308C6sL
मुंबई: राज्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून गुरुवारी आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री आज या वादळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या रायगड जिल्ह्याचा पाहणी दौरा करणार आहेत. यावेळी रायगड जिल्ह्याला दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. निसर्ग वादळाने निम्मा विस्कटून गेला आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांत वादळामुळे मोठी हानी झाली आहे. जिल्ह्यात सुमारे ५ लाख घरांची पडझड झाली असून ५ हजार हेक्टरवरील कृषीक्षेत्राला फटका बसला आहे. जिल्ह्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली असून ८ तालुक्यांत वीज यंत्रणा व दूरध्वनी यंत्रणा पूर्णपणे ठप्प आहे. किमान १७०० गावे दोन दिवस अंधारात आहेत. जिल्ह्यातील अनेक रस्ते अजूनही बंद आहेत. या स्थितीचा गुरुवारीच आढावा घेऊन आवश्यकते निर्देश दिल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे आज प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री ठाकरे आज सकाळी ११.३० वाजता मुंबईतून बोटीने रायगड जिल्ह्यात जाणार आहेत. गोल्डन गेट ते मांडवा जेटी असा प्रवास मुख्यमंत्री बोटीने करतील. तिथून मोटारीने ते अलिबागमधील थळ येथे पोहचतील. तेथीन नुकसानग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर दुपारी अलिबाग येथील जिल्हा मुख्यालयात सर्व संबंधित प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मुख्यमंत्री आढावा घेतील, असे सांगण्यात आले. दोन दिवसांत सादर करा पंचनामे दरम्यान, धडकल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत सादर करावेत, म्हणजे शेतकरी व गावकऱ्यांना तातडीने मदत करता येईल. विशेषत: रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विजेचे खांब पडले असून, महावितरणने तातडीने वीजपुरवठा सुरू करावा व प्रसंगी त्यासाठी इतर ठिकाणाहून जास्तीचे मनुष्यबळ, साधन सामग्री उपलब्ध करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारीच दिले आहेत. ५ लाख घरांचे नुकसान, १ लाख झाडे पडली रायगड जिल्ह्यात सुमारे ५ लाख घरांचे नुकसान झाले आहे. १ लाखाहून जास्त झाडे पडली आहेत. आणि मुरुडच्या मध्ये चक्रीवादळ धडकले, त्याचा फटका श्रीवर्धनला जास्त बसला असून सर्व दळणवळण ठप्प झाले आहे. विजेचे खांब हजारोंच्या संख्येने पडले आहेत. जिल्ह्यांत ५ हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून पंचनाम्यासाठी पथके बाहेर पडली आहेत. मात्र अंतर्गत रस्ते खूप खराब झाले आहेत. काही ठिकाणी रुग्णवाहिकाही पाठवणे शक्य झालेले नाही. लोकांत दूरध्वनी व मोबाइल सेवा खंडीत झाल्याने ते घाबरले आहेत, त्यांना इतरांशी संपर्क शक्य होत नाही. टेलिकॉम यंत्रणा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वीज नसल्याने ५०० मोबाइल टॉवर बंद पडले आहेत. १० बोटी अंशत: नुकसान झाले असून १२ हेक्टर मत्स्यशेती खराब झाली आहे, अशी माहिती गुरुवारी रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी आढावा बैठकीत दिली होती.