मुंबई: आजच्या जागतिक दिनानिमित्त मनसे अध्यक्ष यांनी आणि ट्विटरच्या माध्यमातून खास संदेश दिला आहे. देश गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन असताना राज ठाकरे यांचा हा संदेश सर्वांनीच बोध घ्यावा असा आहे. राज ठाकरे यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपल्या मनातील भावना व्यक्त करताना सध्या सुरू असलेली टाळेबंदी पर्यावरण आणि वन्यजीवांसाठी कशी दिलासा देणारी ठरलीय, त्यावर बोट ठेवलं आहे. राज यांनी पशुपक्ष्यांच्या मुक्तसंचाराचे निवडक फोटो पोस्टसोबत जोडत आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांत ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातून आपला संदेश दिला आहे. 'आपण टाळेबंदीत आहोत म्हणून हे प्राणी पक्षी त्यांच्या हक्काच्या अधिवासात मुक्त संचार करू शकत आहेत. आपण त्यांच्या अधिवासावर केलंय त्यांनी आपल्या नाही; हे जरी ह्या टाळेबंदीने शिकवलं तरी #WorldEnvironmentDay चं सार्थक झालं म्हणता येईल', असं ट्विट तसेच फेसबुक पोस्ट राज यांनी टाकली आहे. या पोस्टमधून राज ठाकरे यांच्यातील वन्यप्राण्यांबद्दलचं प्रेम तसेच पर्यावरण संवर्धनासाठीचा आग्रह पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात टाळेबंदीची घोषणा केली. गेले दोन महिन्यांहून अधिक काळापासून देश लॉकडाऊन आहे. अर्थातच लॉकडाऊनमुळे रस्त्यांवरची वर्दळ थांबली आहे. लॉकडाऊनने एकीकडे नागरिकांची कोंडी केली असली तरी याच काळात वन्यप्राण्यांनी मात्र मोकळा श्वास घेतल्याचे दिसत आहे. वन्यप्राणी थेट रस्त्यावर, भर वस्तीत मुक्तसंचार करत असल्याचे देशाच्या विविध भागांत पाहायला मिळत आहे. राज यांनी याचाच संदर्भ घेत पर्यावरण दिनी हा संदेश दिला आहे. दरम्यान, राज ठाकरे हे पर्यावरण संवर्धनासाठी नेहमीच आग्रही राहिलेले आहेत. पर्यावरणाबाबत विविध मुद्द्यांवर त्यांनी वेळोवेळी आवाज उठवलेला आहे. मेट्रो कारशेडसाठी 'आरे' परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली. त्यावेळी राज यांनी तेव्हाच्या फडणवीस सरकारवर आणि शिवसेनेवर सडकून टीका केली होती. फडणवीस सरकारमधील पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना राज यांनी लक्ष्य केले होते.