वार्तांकनासाठी पत्रकारावर FIR; 'एडिटर्स गिल्ड'ची नाराजी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, June 20, 2020

वार्तांकनासाठी पत्रकारावर FIR; 'एडिटर्स गिल्ड'ची नाराजी

https://ift.tt/37MYjON
नवी दिल्ली : यांनी दत्तक घेतलेल्या वाराणसीच्या गावावर वार्तांकन करणं एका महिला पत्रकाराला महागात पडलंय. 'स्क्रोल' या वृत्तविषयक वेबसाइटच्या कार्यकारी संपादक सुप्रिया शर्मा यांच्यावर वाराणसीमधील रामनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याच प्रकारावर ''नं तीव्र नाराजी आणि चिंता व्यक्त केलीय. करोनामुळे लावलेल्या लॉकडाउनचा उत्तर प्रदेशातील डोमरी गावातील नागरिकांवर झालेल्या परिणामांबाबत वार्तांकन करणाऱ्या एका पत्रकारावर एफआयआर दाखल करणे चुकीचे असून या घटेमुळे प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचा संकोच होत आहे, या शब्दांत 'एडिटर्स गिल्ड'नं निषेध व्यक्त केला आहे. पत्रकारावर दाखल करणं ही चिंतेची बाब आहे. पत्रकारांविरोधात फौजदारी कायद्याचा वापर करण्याची चुकीची प्रथा पाडली जात असून अशा प्रकारांना लोकशाहीत स्थान असू नये. पत्रकाराविरुद्धची तक्रार तत्काळ मागे घेण्यात यावी, असंही गिल्डनं म्हटलंय. पत्रकार शर्मा यांच्यावर जीवघेण्या आजाराच्या संसर्गाचा धोका निर्माण होईल असं बेजबाबदार वर्तन करणं, अवमानकारक मजकूर प्रसिद्ध करणं यांसह अॅट्रॉसिटी कायद्यान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याचा गिल्डने स्पष्ट शब्दांत निषेध केला आहे. वाचा : वाचा : वाचा : गुजरातमध्ये गुन्हा दाखल वाराणसीच्या रामनगर पोलीस स्टेशनमध्ये १३ जून रोजी कलम २६९ आणि ५०१ नुसार ही तक्रार दाखल करण्यात आली. माला देवी यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. माला देवी यांच्या नावाचा उल्लेख असणारी सुप्रिया शर्मा यांची बातमी ८ जून रोजी प्रकाशित करण्यात आली होती. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दत्तक घेतलेल्या वाराणसीच्या गावात लॉकडाऊन दरम्यान लोकांना उपाशी राहण्याची वेळ आल्याचं' या बातमीत म्हटलं होतं. वाचा : वाचा : वाचा : वाचा :