आज देखील सोने, चांदी सुस्साट; दिवाळीपर्यंत जाणार ५६ हजारावर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, July 31, 2020

आज देखील सोने, चांदी सुस्साट; दिवाळीपर्यंत जाणार ५६ हजारावर

https://ift.tt/2DhO4XM
नवी दिल्ली: अपेक्षेप्रमाणे सोन्या आणि चांदीच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. जुलै महिन्याच्या अखेरच्या दिवशी सोन्याने आतापर्यंतची सर्वोच्च पातळी गाठली. आज सोन्याचा भाव ५३ हजार ५५० रुपये प्रती १० ग्रॅमवर गेला. हा सोन्याचा आतापर्यंतचा सर्वोच्च दर आहे. बाजार सुरू होताच तेजीने वाढले. त्याच बरोबर चांदीच्या किमती मोठी वाढ झाली. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याज दराबाबत घेतलेल्या निर्णयानंतर आणि चांदीचे भाव वाढले वाढलेत. सोने ५३ हजार ५००च्या पुढे तर चांदीचा दर ६३ हजार ६००च्या पुढे गेला आहे. डॉलर जस जसा कमकुवत होत चालला आहे तस तसा सोन्या आणि चांदीच्या किमती आणखी वाढणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. MCX वर आज सकाळी ९.१५ वाजता बाजार सुरू होताच ऑगस्ट महिन्या डिलिव्हरी होणाऱ्या सोन्याच्या किमतीत ४१२ रुपयांची तेजी आली आणि तो ५३ हजार ५५० वर पोहोचला. गुरुवारी सोन्याचा दर ५३ हजार १३८ रुपयांवर बंद झाला. आज सकाळी तो ५३ हजार ५२६वर सुरू झाला. ऑक्टोबर महिन्यात डिलिव्हरी होणाऱ्या सोन्याच्या किमती ४३७ रुपयांनी वाढून त्या ५३ हजार २१७ रुपयांवर पोहोचला. तर डिसेंबर महिन्यात डिलिव्हरी होणाऱ्या सोन्याच्या किमतीत ४२८ रुपयांची वाढ होत तो ५३ हजार ३५६ रुपयांवर गेला. चांदीच्या किमतीचा विक्रम MCXवर सकाळी ९.१० वाजता बाजार सुरू होताच सप्टेंबर महिन्यात डिलिव्हरी होणाऱ्या चांदीच्या दरात १ हजार २५ रुपयांची वाढ होत तो ६३ हजार ६९५ वर गेला. गुरुवारी चांदीचा दर ६२ हजार ६७० वर बंद झाला होता. तो आज सकाळी ६३ हजार ३४४ वर सुरू झाला. आतपर्यंतच्या व्यवहारात ६३ हजार ७२८ च्या स्तरावर पोहोचली आहे. डिसेंबरमध्ये डिलिव्हरी होणाऱ्या चांदीच्या किमतीत ९४६ रुपयांची वाढ होत तो ६५ हजार २५३ रुपयांवर पोहोचला. केडिया कमोडिटीचे एमडी अजय केडिया म्हणाले, सोन्याची किमतीमधील तेजी अशीच कायम राहील. काल अमेरिकन डॉलर मध्ये घसरण झाल्यानंतर सोन्याच्या किमती वाढल्या होत्या. अमेरिकेची आर्थिक स्थिती कमकूवत झाल्यामुळे लोक सुरक्षित गुंतवणूक करत आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या किमतीत चढ उतार होत होती पण आता त्याच्या तेजी दिसत आहे. दिवाळीपर्यंत सोने ५६ हजारवर पोहोचू शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने लवकरच २ हजार डॉलरच्या स्तराला पोहोचू शकतो. डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाल्याने सोन्याच्या किमतीत () तेजी आली आहे. दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी सोन्याच्या किमती १० ग्रॅमसाठी ११८ रुपयांची वाढ झाली. पण चांदीच्या किमतीत मात्र २ हजार ३८४ रुयपांची घसरण झाली. दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किती १० ग्रॅमसाठी ५३ हजार ८६० रुपयांवर गेला. तर चांदी ६४ हजार १०० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.