वॉशिंग्टन: करोनाच्या संसर्गावर मात करण्यासाठी आता आयुर्वेदिक औषधे व उपायांची चाचपणी करण्यात येणार आहे. करोनावर प्रभावी ठरू शकणाऱ्या आयुर्वेदिक औषधांची भारत व अमेरिकेतील आयुर्वेदिक डॉक्टर तसेच, संशोधक लवकरच संयुक्त प्रयोगशाळा चाचणी सुरू करणार आहेत. उभय देशांतील शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि डॉक्टरांमध्ये नुकत्याच झालेल्या एका वेब परिसंवादामध्ये ही कल्पना मांडण्यात आली, अशी माहिती भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजितसिंग संधू यांनी दिली. 'अमेरिकेत विविध क्षेत्रांतील संस्था परस्परांच्या संपर्कात असून, त्याच माध्यमातून हा प्रयोग करण्यात येणार आहे. इंडो-यूएस सायन्स टेक्नॉलॉजी फोरमतर्फे उभय देशांतील शास्त्रज्ञ आपापल्या ज्ञानाची देवाणघेवाण करत आहेत. केवळ करोनाविषयीच नव्हे; तर एकंदरीतच आयुर्वेदिक उपचारपद्धतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न उभय देशांतील आयुर्वेदिक डॉक्टर करणार आहेत,' असे संधू यांनी सांगितले. वाचा: वाचा: विविध औषधे व लशी अतिशय वाजवीच्या दरांत उत्पादित करण्यात भारतीय कंपन्या नेहमीच आघाडीवर असतात. सद्यस्थितीत उभय देशांच्या कंपन्या एकत्रितपणे करोनावर किफायतशीर दरातील लस शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. ही लस यशस्वी ठरल्यास त्याचा लाभ या दोन देशांसह जगभरातील अब्जावधी नागरिकांना होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वाचा: अन्य आजारांवरही संशोधन व्हॅक्सिन अॅक्शन प्रोग्राम अंतर्गत उभय देशांतील संशोधक व तज्ज्ञ हे संशोधन करत असून करोनाव्यतिरिक्त टीबी, इन्फ्लूएन्झा, चिनकगुनिया आदी आजारांवरही लस संशोधित करण्याचे प्रयत्न होत आहेत. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेकडून २९ जून रोजी प्रसिद्ध झालेल्या ताज्या माहितीनुसार वैद्यकीय प्रक्रियेच्या माध्यमातून पाच मायक्रॉनहून लहान थेंब अथवा एरोसोल तयार झाले, तरच या विषाणूचा हवेतून प्रसार शक्य आहे. मास्कचा वापर, सुरक्षित वावर आणि सतत हात धुणे ही काळजी घेतली तर विषाणूपासून दूर राहता येणे शक्य आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. मात्र, विषाणू हवेतून पसरत असेल, तर गर्दीची ठिकाणे, कोंदट असलेल्या बंद जागा येथे सर्वाधिक धोका असू शकतो. बंद जागेतही मास्क घालणे आवश्यक ठरते. तसेच सुरक्षित वावराच्या सध्याच्या अंतराबाबतही प्रश्न निर्माण होतो