कानपूर पोलीस हत्याकांडातील मुख्य आरोपी गँगस्टर हा पोलीस चकमकीत मारला गेला आहे. एखाद्या चित्रपटात शोभेल असा त्याचा एन्काऊंटर झाला आहे. कानपूरमधील घटनेनंतर फरार असलेल्या विकास दुबेला काल रात्री येथे अटक करण्यात आली होती. कानपूर, : हत्याकांडातील मुख्य आरोपी हा पोलीस एन्काऊन्टरमध्ये ठार झालाय. कानपूरच्या लाला लाजपत राय रुग्णालयातील डॉक्टरांनी विकास दुबे याला मृत घोषित केलंय. मुंबई : लॉकडाउनच्या काळात तब्बल८५ दिवस पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर स्थिर ठेवले होते. मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यात देशात 'अनलॉक-१' ची प्रक्रिया सुरु झाली आणि पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलची भाववाढ सुरु केली. ही प्रक्रिया जवळपास तीन आठवडे सुरु होती. त्यामुळे दिल्लीत पहिल्यांदाच डिझेलच्या किमती या पेट्रोलच्या तुलनेत वाढल्या. मुंबईत पेट्रोल ९० च्या उंबरठ्यावर गेले. यामुळे महागाईचा भडका उडेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. माल वाहतूक आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणात डिझेलचा वापर करते. मुंबई : आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS)ला जूनच्या तिमाहीत बाजाराच्या अपेक्षेपेक्षा कमी महसूल मिळाला. कॉरपोर्रेट्सच्या कामगिरीला करोनाने जबर दणका दिला आहे. त्यामुळे टीसीएसचे निराशाजनक निकाल बाजाराची दिशा बदलतील, असे कोटक सिक्युरिटीजचे विश्लेषक श्रीकांत चौहान यांनी सांगितले. ते म्हणाले की निफ्टी १०८५० अंकावर गेला तर त्याला ११००० चा स्तर गाठण्यात वेळ लागणार नाही. मात्र दुसऱ्या बजावला त्यात घसरण झाली तर तो १०५५० पर्यंत खाली येईल. मुंबई : आज सराफा बाजारात सोने ४०० रुपयांनी वधारले आहे. सोन्याचा भाव १० ग्रॅमला ४९१०० रुपये झाला आहे. चांदीमध्ये तेजीची लाट असून आज प्रती किलो ५२०२० रुपये झाला. त्यात १२० रुपयांची वाढ झाली आहे. मुंबईत यापूर्वीच सराफा पेढींवर सोन्याचा भाव १० ग्रॅमला ५१००० रुपयांवर (करांसहित) गेला होता.