शेअर बाजार ; तेजीची लाट आणि निर्देशंकांची आगेकूच - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, July 3, 2020

शेअर बाजार ; तेजीची लाट आणि निर्देशंकांची आगेकूच

https://ift.tt/2YRqkSG
मुंबई : करोनाचे थैमान सुरु असले तरी अमेरिकेत रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली आहे. मंदी आणि करोना व्हायरसने बेजार झालेली अमेरिकन अर्थव्यवस्था ह्ळुहळू पूर्वपदावर येत आहे. यामुळे गुरुवारी अमेरिकेतील शेअर बाजार उच्चांकी स्तरावर गेले. त्याशिवाय इतर प्रमुख देशांची आर्थिक स्थिती सुधारत असल्याने जागतिक पातळीवर सकारात्मक वातावरण दिसून आले. युरोपातील बहुतांश बाजार तेजीसह बंद झाले. स्थानिक बाजाराचा विचार केला तर सध्या तेजीच्या वाटेवर आहे. तो १०४१० अंकांवर त्याला सपोर्ट आहे तर घसरण झाली तर १०१९४ अंकांपर्यंत मर्यादित राहील, असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे शेअर बाजार विश्लेषक दीपक जसानी यांनी सांगितले. लडाख सीमेवरील भारत आणि चीनदरम्यानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात चीनी सामानाला विरोध करणे सुरू आहे. जनतेत ही भावना वाढीला लागत असताना केंद्र सरकार, सरकारी उपक्रम आणि विविध मंत्रालयांनीही चीनच्या औद्योगिक आणि व्यापार धोरणाला धोबीपछाड देणे सुरू केले आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यानंतर आता अन्न आणि नागरी पुरवठामंत्री यांनीही चीनला धडा शिकवण्याचे ठरवले आहे.भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनची आर्थिक नाकेबंदी करत भारताने ५९ चिनी अॅपवर बंदी घातली. त्यानंतर देशातील मोठ्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांमध्ये चिनी कंपन्यांवर बंदी घातली जाणार आहे. केंद्रीय परिवहन मत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली आहे. भारतातील महामार्ग प्रकल्पांमध्ये चिनी कंपन्यांवर बंदी घालण्यात येणार आहे, असे गडकरी यांनी सांगितले आहे. देशांतर्गत शेअर बाजारात निर्माण झालेली तेजीची लाट गुरुवारीही कायम राहिली. सकाळी व्यवहारांना सुरुवात झाल्यानंतर दिवसभर बाजारात खरेदीचा माहोल दिसून आला. त्यामुळे बाजार बंद होताना ते वाढीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक () ४२९.२५ अंकांच्या तेजीसह ३५,८४३.७० अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १२१.६५ अंकांनी वाढून १०,५५१.७०च्या पातळीवर बंद झाला. सत्रांतर्गत व्यवहारांदरम्यान सेन्सेक्समध्ये ६००पेक्षा अधिक अंकांची नोंदवून तो ३६,०१४च्या पातळीपर्यंत गेला होता. दरम्यान, निफ्टीनेही १०,५००चा स्तर गाठला. मुंबई शेअर बाजारामध्ये गुरुवारी ग्राहकोपयोगी वस्तूंच्या समभागांनी सर्वाधिक म्हणजे ५५२ अंकांची तेजी प्राप्त केली. याशिवाय वाहन उद्योग, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागही वरच्या पातळीवर बंद झाले. गुरुवारी तेजीचा लाभ बीएसईमधील सर्वच क्षेत्रांना झाला. बँकिंग सोडून सर्व क्षेत्रे वरच्या पातळीवर बंद झाली. बँकिंगमधील अॅक्सिस बँकेच्या समभागात सर्वाधिक (२.२४ टक्के) घसरण नोंदविण्यात आली. बंधन बँकेचा समभाग ६.२० टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.