काश्मीर: सीआरपीएफ गस्ती पथकावर मोठा दहशतवादी हल्ला; ३ जवान, १ नागरिक जखमी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, July 1, 2020

काश्मीर: सीआरपीएफ गस्ती पथकावर मोठा दहशतवादी हल्ला; ३ जवान, १ नागरिक जखमी

https://ift.tt/3eJyIsS
श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरमधील सोपोर येथे सुरक्षा दलाच्या गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे () ३ जवान जखमी झाले आहेत. तर या दहशतवादी हल्ल्यात सोपोरमधील एका नागरिकही जखमी झाला आहे. सोपोरमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाचे पथक गस्तीसाठी आपल्या वाहनातून खाली उतररत असताना दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी अचानक सीआरपीएफच्या जवानांवर अंदाधुंद गोळीबार करणे सुरू केले. यात सीआरपीएफचे ३ जवान जखमी झाले. जवानांनी परिसराला घेरले आज बुधवारी सकाळी केंद्रीय राखीव पोलिस दलाचे पथक गस्तीसाठी निघाले होते. हे पथक रेबन येते आपल्या वाहनातून खाली उतरत होते. त्या वेळी अचानक हा हल्ला करण्यात आला. ही माहिती मिळताच सीआरपीएफची दुसरे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. लागलीच या भागाला घेराव घालण्यात आला असून या दहशतवाद्यांना हुडकून काढण्यासाठी शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. काल मंगळवारी अनंतनाग जिल्ह्यातील वाघमा भागात सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत २ दहशतवादी ठार झाले होते. या भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागात शोधमोहीम हाती घेतली. या पूर्वी सोमवारी सुरक्षा दले आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत अनंतनागमधील खुलचोहर भागात ३ दहशतवाद्यांना ठार केले होते. त्यानंतर डोडा जिल्हा दहशतवाद मुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले. वाचा: ३० दिवसांमध्ये १८ चकमकी आणि ५१ दहशतवादी ठार गेल्या महिन्याभराच्या काळात जम्मू आणि काश्मीरमधील विविध भागांमध्ये सुरक्षादले आणि दहशतवाद्यांमध्ये १८ चकमकी झाल्या. यात एकूण ५१ दहशतवादी मारले गेले. १ जून या दिवशी नौशेरा भागात ३, २ जूनला पुलवाम्यातील त्राल भागात २, ३ जूनला पुलवाम्यातील कंगन भागात ३, ५ जूनला राजौरीच्या कालाकोट भागात १, ७ जूनला शोपियानच्या रेबन भागात ५, ८ जूनला शोपियानच्या पिंजोरा भागात ४, १० जूनला शोपियानच्या सुगू भागात ५, १३ जूनला कुलगामच्या निपोरा भागात २, १६ जूनला शोपियानच्या तुर्कवंगम भागात ३, १८ आणि १९ जूनला अवंतीपोरा आणि शोपियानमध्ये ८, २१ जूनला शोपियान येथे ३, २३ जूनला पुलवाम्याच्या बंदजू येथे २, २५ जूनला बारामुल्लाच्या सोपोर येथे २, २५ आणि २६ जूनला पुलवाम्याच्या त्राल येथे ३, २९ जूनला अनंतनागच्या खुलचोहर येथे ३ आणि आज ३० जूनला अनंतनागच्या वाघमा येथे २ दहशतवादी ठार झाले. या प्रमाणे एकूण महिन्याभराच्या काळात एकूण ५१ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. वाचा: वाचा: