सोने-चांदी वधारले ; जाणून घ्या आजचा भाव - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, July 1, 2020

सोने-चांदी वधारले ; जाणून घ्या आजचा भाव

https://ift.tt/3eOV6RK
मुंबई : स्थानिक कमॉडिटी बाजारात मंगळवारी झालेल्या नफावसुलीनंतर आज सोने आणि चांदीच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार आज सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४८५५९ रुपये झाला. त्यात २५ रुपयांची वाढ झाली. तर चांदीमध्ये ४४ रुपयांची वाढ झाली असून प्रती किलो ४८६०० रुपये झाला. कमॉडिटी बाजारात मंगळवारी सोन्याच्या किमती ४८८२५ रुपयांच्या विक्रमी स्तरावर गेल्या होत्या. मात्र त्यात नंतर जोरदार नफा वसुली झाली. काल सोने २५० रुपयांनी स्वस्त झाले.कमॉडिटी बाजारात याआधी ४८२८९ रुपयांचा सार्वकालीन उच्चांकी दर होता. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार मंगळवारी दिल्लीत सोने ११९ रुपयांनी महागले. सोन्याचा भाव ४९३०६ रुपयांवर गेला. चांदी १४०८ रुपयांनी वधारले असून चांदीचा दर ४८०७५ रुपये झाला आहे. goodreturns.in या वेबसाईटनुसार आज बुधवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७३५० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ४८३५० रुपये झाला आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोनं ४७१०० रुपये आणि २४ कॅरेटचा भाव ४८३०० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेटचा भाव ४७६७० रुपये आणि २४ कॅरेटचा भाव ४८९४० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६२७० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ५०४८० रुपये झाला आहे. जागतिक बाजारात मंगळवारी स्पॉट गोल्ड (SpotGold) १७७३ डॉलर प्रती औंसवर ट्रेड करत आहे. चांदीचा भाव १७.८६ डॉलर प्रती औंस आहे. आर्थिक पॅकेजच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीत चालू वर्षात १६ टक्के वाढ झाली आहे. वाचा : करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने बड्या देशांमधील केंद्रीय बँकांनी अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आर्थिक पॅकेजची तयारी सुरु केली आहे. परिणामी भांडवली बाजारातील संस्थात्मक गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यांनी गुंतवणुकीची स्ट्रॅटेजी बदलली आहे. संस्थात्मक गुंतवणूकदार मौल्यवान धातूला गुंतवणुकीसाठी पसंत करत आहेत. महागाई आणि चलनातील अवमूल्यनाला हेजिंगचा भक्कम पर्याय म्हणूनदेखील सोने गुंतवणूकदारांना वरदान ठरत आहे. सोने खरेदीमध्ये भारत हा जगातील मोठ्या ग्राहक देशांपैकी एक आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अंदाजानुसार भारतीयांकडे २२००० ते २५००० टन सोने आहे. त्यापैकी ६५ टक्के सोने हे ग्रामीण भारतात आहे. या अवाढव्य सोन्यापैकी केवळ १.२ टक्के सोने गहाण ठेवण्यात आले आहे. त्यामुळे गोल्ड लोन व्यवसायात प्रचंड संधी असल्याचे जाणाकरांचे म्हणणे आहे.