टेलिकॉम कंपनी बंदीनंतर अमेरिका चीनला देणार आणखी धक्का! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, July 7, 2020

टेलिकॉम कंपनी बंदीनंतर अमेरिका चीनला देणार आणखी धक्का!

https://ift.tt/2ZYr4oz
वॉशिंग्टन: भारतानंतर आता अमेरिकादेखील चीनला जोरदार धक्का देणार आहे. टेलिकॉम क्षेत्रातील दोन कंपन्यांवर बंदी घातल्यानंतर आता अमेरिका टिकटॉकसह अन्य चिनी अॅप्सवर बंदी आणण्याबाबत गंभीर विचार करत आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो यांनी सोमवारी रात्री उशिरा याबाबत माहिती दिली. तर, दुसरीकडे ऑस्ट्रेलियातही चिनी अॅप्सवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी सुरक्षितेच्या कारणास्तव भारताने चिनी कंपन्यांची मालकी असलेल्या ५९ अॅप्सवर बंदी आणली होती. त्यानंतर चिनी कंपन्यांनी भारतीय ग्राहकांचा डेटा चीन सरकार अथवा कोणासोबतही शेअर केला जात नसल्याचे स्पष्ट केले होते. चिनी कंपनी बाइट डान्सला या बंदीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. टिकटॉकवर बंदी आणल्यामुळे जवळपास ६ अब्ज डॉलरचे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. अमेरिकादेखील आता चीनला धडा शिकवण्यासाठी चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचा विचार करत आहे. टिकटॉक अॅपमुळे देशाच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला असल्याची भूमिका काही अमेरिकन खासदारांनी घेतली. चीनमध्ये टिकटॉकवर बंदी आहे. बाइट डान्स कंपनीकडून चीनच्या नियमांअनुसरून एक वेगळे अॅप विकसित करण्यात आले आहे. या दोन्ही अॅपसाठी दोन वेगवेगळे सर्व्हर वापरले जात असल्याचे म्हटले जाते. वाचा: वाचा: व्यापार करार आणि करोना संसर्गाच्या मुद्यावर अमेरिका आणि चीनमध्ये वाद सुरू आहे. करोनाचा संसर्ग चीनमुळेच पसरला असल्याचा आरोप सातत्याने अमेरिका करत आहे. या आरोपावरून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्यातच भारताने अॅप बंदी केल्यानंतर अमेरिकेनेही चीनला झटका देत टेलिकॉम क्षेत्रातील हुवैई टेक्नोलॉजी आणि झेडटीई कॉर्प या कंपन्यांना व्यवसाय करण्यास बंदी घातली. अमेरिकन सरकारने या कंपन्यांसोबत करारदेखील केला होता. या करारानुसार, ८.४ अब्ज डॉलर किंमतीच्या वस्तू, उपकरणे खरेदी करण्यात येणार होते. मात्र, यासाठीचा निधी थांबवण्यात आला आहे. अमेरिकेच्या या निर्णयानंतर दोन्ही कंपन्यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. अमेरिका फेडरल कम्युनिकेशन कमिशनने म्हटले की, टेलिकॉम कंपन्यांना आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरमधून या दोन्ही कंपन्याच्या उपकरणांना हटवावे लागणार आहे. अमेरिकेच्या सुरक्षितेसोबत कोणतीही जोखीम घेणार नसल्याचेही कमिशनने म्हटले होते. अमेरिका अॅप्स बंदी करून चीनला आणखी एक दणका देणार आहे. आणखी वाचा: