नवीन आर्थिक घोटाळा; पंजाब नॅशनल बँक पुन्हा हादरली! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, July 10, 2020

नवीन आर्थिक घोटाळा; पंजाब नॅशनल बँक पुन्हा हादरली!

https://ift.tt/3gMR5xU
मुंबई : हिरे व्यापारी नीरव मोदीच्या १३००० कोटींच्या घोटाळ्यातून सावरत नाही तोच पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) पुन्हा एकदा आर्थिक घोटाळ्याने हादरली आहे. दिवाण हौसिंग फायनान्स लिमिटेड (डीएचएफएल) या कंपनीला दिलेल्या ३६८८ कोटींच्या कर्जात बँकेची फसवणूक झाली आहे. या घोटाळ्याची कबुलीच पीएनबी बँकेने रिझर्व्ह बँकेला दिली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी मोठी बँक असलेल्या पीएनबी बँकेतील नव्या आर्थिक घोटाळ्याने बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दिवाण हौसिंग फायनान्स कंपनीने घेतलेल्या ९७००० कोटींच्या बँक कर्जांपैकी ३१००० कोटी बनावट कंपन्यांच्या (शेल कंपन्या) माध्यमातून घेतली आहेत, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पीएनबी बँकेला झटका बसला आहे . 'पीएनबी'ने रिझर्व्ह बँकेला सादर केलेल्या अहवालात दिवाण हौसिंगच्या कर्ज खात्यात ३६८८.५८ कोटींची फसवणूक झाली आहे. यासाठी बँकेने १२४६.५८ कोटींची तरतूद केली असल्याचे म्हटलं आहे. ही माहिती शेअर बाजाराला कळवल्यानंतर हा घोटाळा उघड झाला. दिवाण हौसिंगच्या कर्जांबाबत एसबीआय, युनियन बँक ऑफ इंडिया आणि इंडसइंड बँक यांनी धोक्याची सूचना दिली होती. वाचा : दिवाळखोरीत निघालेल्या दिवाण हौसिंगच्या बँक खात्यांची आणि कर्जाची विविध तपास यंत्रणांकडून चौकशी केली जात आहे. बनावट कंपन्या भासवून दिवाण हौसिंगने बँकांकडून हजारो कोटींची कर्जे घेतली आहेत. कंपनीने राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे दिवाळखोरीसाठी दावा दाखल केला आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये रिझर्व्ह बँकेने दिवाण हौसिंग फायनान्सचे संचालक मंडळ बरखास्त केले होते. दिवाण हौसिंगवर ८५००० कोटींचे कर्ज आहे. कंपनीने किमान १०००० कोटींचा घोटाळा केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात गंभीर गुन्हे तपास पथक, सक्तवसुली संचनालय (ईडी) या तपास यंत्रणा चौकशी करत आहेत. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील ( ) प्रमुख आरोपी नीरव मोदी ( ) आणि मेहुल चोकसी (Mehul Choksi) यांची जवळपास १३००० कोटींची कर्जे बनावट कागदपत्रे सादर करुन घेतली. हे दोनही आरोपी फरार असून त्यांच्या विरोधात खटला सुरु आहे. आणि दिवाण हौसिंग फायनान्स लिमिटेड ( ) या प्रकरणात नुकताच सीबीआयने आरोपपत्र दाखल केले. येस बँकेने दिलेल्या कर्जाऊ रक्कमेचा गैरवापर करतानाच डीएचएफएलने हे कर्ज बुडवले. याबद्दल येस बँकेचे संस्थापक व डीएचएफएलचे प्रवर्तक बंधू कपिल व यांच्याविरुद्ध ह आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. राणा कपूर व वाधवान बंधू सध्या सीबीआयच्या कोठडित आहेत. वाधवान यांना एप्रिल महिन्यात महाबळेश्वरहून ताब्यात घेण्यात आले होते. हे तिघेही सध्या तळोजाच्या कारागृहात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येस बँकेने डीएचएफएलच्या रोख्यांमध्ये ३७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्याबदल्यात डीएचएफएलने डॉइट अर्बन या कंपनीला ६०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. डॉइट अर्बन ही कंपनी राणा कपूर यांच्या मुलींच्या नावे आहे. पुढे हे कर्ज बुडित खात्यात गेले. या प्रकरणात पैशांचा मोठा गैरव्यवहार झाल्याचा सीबीआयला संशय आहे. येस बँकेने वाधवान बंधूंच्या एका कंपनीला ७५० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. त्याचाही तपास सीबीआयकडून सुरू आहे.