अळीमिळी गुपचिळी; CEOचा राजीनामा स्विकारण्यास घेतले सहा महिने! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, July 10, 2020

अळीमिळी गुपचिळी; CEOचा राजीनामा स्विकारण्यास घेतले सहा महिने!

https://ift.tt/3ejai8u
मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा राजीनामा तब्बल सहा महिन्यानंतर गुरुवारी स्विकारण्यात आला. जोहरी यांच्या राजीनाम्यावर बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अळीमिळी गुपचिळी साधली आहे. जोहरी यांनी २७ डिसेंबर २०१९ रोजी राजीनामा दिला होता. वाचा- यासंदर्भात एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, गुरूवारी राजीनामा स्विकारण्याबाबत निर्णय घेतला गेला आहे. जोहरी यांचा राजीनामा स्विकारण्याबाबत बोर्डाने अचानक निर्णय का घेतला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. जोहरी २०१६ पासून बीसीसीआयशी जोडले गेले आहेत. त्याचा करार २०२१ पर्यंत होता. सौरभ गांगुलीने अध्यक्षपताची सूत्रे हाती घेतल्यानंतर जोहरी यांनी राजीनामा दिला होता. वाचा- जोहरी यांना २०१६ मध्ये या पदावर नियुक्त करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाद्वारे प्रशासकिय समितीची नियुक्ती गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पायउतार झाल्यानंतर त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारीपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. ज्यामुळे सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीमला काम करता येईल. वाचा- CEO पदाची जबाबदारी घेतल्यानंतर जोहरी यांनी अनेक आघाड्यांवर काम केले. यात आयपीएलचे प्रसारण अधिकारी स्टार इंडियाला १६ हजार ३४८ कोटी रुपयांना विकण्याची महत्त्वाच्या कामगिरीचा समावेश होतो. वाचा-