दिलासा ; सलग तिसऱ्या दिवशी इंधन दरवाढ टळली - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, July 29, 2020

दिलासा ; सलग तिसऱ्या दिवशी इंधन दरवाढ टळली

https://ift.tt/33575Y8
मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केला नाही. मुंबईत बुधवारी पेट्रोलचा भाव ८७.१९ रुपये असून डिझेलचा भाव प्रती लिटर ८०.११ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल ८०.४३ रुपये असून डिझेलचा भाव ८१.९४ रुपयांवर कायम आहे.चेन्नईत पेट्रोल ८३.६३ रुपये असून डिझेल ७८.८६ रुपये आहे. तर कोलकात्यात पेट्रोल ८२.१० रुपये आहे. तर डिझेल ७७.०४ रुपये प्रती लीटर आहे. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव ४४ डॉलर प्रती बॅरलच्या आसपास आहे यापूर्वी रविवारी पेट्रोलियम कंपन्यांनी डिझेलमध्ये १५ पैशांनी वाढ केली होती. सलग दुसऱ्या दिवशी डिझेलच्या दरात वाढ नोंदवली गेली. राजधानी दिल्लीत डिझेल प्रति लिटर ८१.९४ रुपयांवर, मुंबईत ते १४ पैशांनी वाढून ८०.१७ रुपये या किमतीवर पोहचले होते. या दरांमध्ये स्थानिक कर, मूल्यवर्धित कर यांची भर पडून डिझेल आणखी महागले. देशात पेट्रोल आणि डिझेल नियंत्रणमुक्त आहेत. २०१० मध्ये सरकारने पेट्रोल नियंत्रणमुक्त केले होते. तर २०१४ मध्ये डिझेल दर नियंत्रणमुक्त करण्यात आले. देशात इंधन दर जागतिक बाजाराशी संलग्न करण्यात आले आहेत. दररोज सकाळी इंधन दर आढावा घेतला जातो. १६ मार्चपासून पेट्रोलियम कंपन्यांनी ८३ दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले होते. यात झालेलं नसून भरून काढण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांनी मागील महिनाभर पेट्रोल आणि डिझेल दर वाढवले. पंजाबमध्ये पेट्रोल पंप चालक संपावर पंजाबमधील पेट्रोल पंप चालक आणि डीलर्सनेआज बुधवारी संपाची हाक दिली आहे. पंजाबमध्ये हरियाणाच्या तुलनेत सर्वाधिक ट्रक असल्याने पंजाबमधील पेट्रोल पंप चालकांना मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. दररोज डिझेलच्या किमतीत वाढ होत असून पंप चालकांना आर्थिक फटका बसत असल्याचे त्यांनी एक दिवसीय संपाची हाक दिली आहे.