वाचा: आजच्या ठळक बातम्या अगदी थोडक्यात - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, July 7, 2020

वाचा: आजच्या ठळक बातम्या अगदी थोडक्यात

https://ift.tt/31OJ0V2
मुंबई : देशातील इंधन दर जागतिक बाजाराशी सलग्न करण्यात आले आहेत. त्यामुळे दररोज सकाळी ६ वाजता कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचा भाव निश्चित करतात. सध्या जागतिक बाजारातला क्रूडचा भाव ४० डाॅलरच्या आसपास असल्याने देशातील पेट्रोल आणि डिझेल महागच आहे. त्यात केंद्र आणि राज्य सरकारचा कर लादलेला आहे. कंपन्यांना आता इंधन दरात कपात करावी अशी मागणी केली जात आहे. मुंबई : स्थानिक कमॉडिटी बाजारात सोमवारी सोन्याचा भाव ०.३७ टक्क्यांनी वधारला. सोने १० ग्रॅमला ४८२२५ रुपये झाले. तर चांदीचा भाव ४९७९० रुपये होता. goodreturns.in या वेबसाईटनुसार आज मंगळवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६९५० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ४७९५० रुपये झाला आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोनं ४६९०० रुपये आणि २४ कॅरेटचा भाव ४८१०० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेटचा भाव ४७२६० रुपये आणि २४ कॅरेटचा भाव ४८५६० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६११० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ५०७२० रुपये झाला आहे. मुंबई : सोमवारी भारतीय बाजारांपाठोपाठ युरोप आणि अमेरिकेतील शेअर बाजारात तेजीची लाट दिसून आली. अमेरिकेच्या सेवा क्षेत्रात अनपेक्षित वृद्धी झाल्याने तेथील भांडवली बाजारात वाढ झाली. तत्पूर्वी युरोपात देखील तेजीचे वातावरण होते. करोना व्हायरसमधून चीन सावरत असल्यांचे दिसून आले आहे. त्यामुळे उत्साहित झालेल्या गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली. युरोपचा मुख्य इंडेक्स असलेल्या एसटीओएक्सएक्स ६०० हा १.६ टक्क्यांनी वधारला. जर्मन आणि फ्रान्समधील शेअर बाजार वधारले होते. मुंबई: मुंबईतील पोलिस उपायुक्तांच्या बदल्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, सोमवारी 'मातोश्री'वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांच्यात बैठक पार पडली. भविष्यात करूनच बदल्या करण्याबाबत यावेळी एकमत झाल्याचे कळते. यासंदर्भात आणखी एक बैठक घेऊन ज्या बदल्यांना स्थगिती दिली आहे तसेच इतर ज्या बदल्या करायच्या आहेत, त्याबाबतची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे कळते. औरंगाबाद: वाढत असल्याने अखेर प्रशासनाने वाळूज परिसरानंतर शहरातही दहा जुलै ते १८ जुलैपर्यंत कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात आरोग्य सेवा व दूध वगळता सर्व आस्थापना, उद्योग, पेट्रोलपंप, भाजी मंडई, किराणा दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय सोमवारी (सात जुलै) विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, उद्योग, व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत घेण्यात आला.