सराफा बाजार ; सोने महागले तर चांदी झाली स्वस्त - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, July 4, 2020

सराफा बाजार ; सोने महागले तर चांदी झाली स्वस्त

https://ift.tt/38sHrND
मुंबई : सराफा बाजारात सोन्याची मागणी आणि साठा यावरून सोन्याची तेजी कायम आहे. तर कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीमध्ये नफावसुली सुरु आहे. शुक्रवारी कमॉडिटी बाजारात सोने १४७ रुपयांनी घसरले. सोन्याचा भाव ०.३१ टक्क्यांनी कमी होऊन ४८०११ रुपयांवर बंद झाला. सोन्याबरोबरच चांदीच्या भावात देखील घसरण झाली आहे. चांदीचा भाव १७९ रुपयांची घसरण झाली. चांदीचा भाव प्रती किलोला ४९०२५ रुपये झाला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार शुक्रवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोने २३७ रुपयांनी वधारले आणि १० ग्रॅमला ४९०२२ रुपये भाव झाला. गुरुवारी सोन्याचा हवं ४८७८५ रुपये होता. चांदीला मात्र नफेखोरीचा फटका बसला. शुक्रवारी चांदीचा भाव ७४० रुपयांनी कमी झाला. चांदीचा एक किलोचा दर ४९०६० रुपये झाला आहे. जळगावात गुरुवारी सोन्याच्या भावाने ५० हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. सकाळी सराफ बाजार उघडल्यानतंर सोन्याचा भाव ४९ हजार २०० तर जीएसटीसह ५१ हजार ५०० रुपयांवर पोहचला होता. जागतिक बाजारात सोन्याचा भाव ०.२२ टक्क्यांनी कमी होऊन १७८६.१० डॉलर प्रती औंसवर बंद झाला. चांदीचा प्रती औंस भाव १८.२३ डॉलरपर्यंत खाली आला आहे. त्यात गुरुवारच्या तुलनेत ०.५० टक्क्यांची घट झाली. goodreturns.in या वेबसाईटनुसार आज शनिवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६५०० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ४७५०० रुपये झाला आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोनं ४७१६० रुपये आणि २४ कॅरेटचा भाव ४८३६० रुपये आहे. दिल्लीत सोने ४०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. कोलकात्यात २२ कॅरेटचा भाव ४७३१० रुपये आणि २४ कॅरेटचा भाव ४८६१० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६२८० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ५०८९० रुपये झाला आहे. आयातीला लॉकडाउनचा फटका करोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशात गेले तीन महिन्यांहून अधिककाळ सुरु असलेल्या लॉकडाउनचा सराफा व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. वाणिज्य खात्याच्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षातील पहिल्या दोन महिन्यात सोने आयात मोठ्या प्रमाणात घटली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात ७९.१४ दशलक्ष डॉलर्सची आयात करण्यात आली. तर गेल्या आर्थिक वर्षात याच दोन महिन्यात ८.७५ अब्ज डॉलर्सचे सोने आयात करण्यात आले होते. सोने आयात निम्म्याहून जास्त घटल्याने सरकारी तिजोरीवरील ताण मात्र कमी झाला आहे. सोने