धर्मचक्र दिन Live: बुद्धाने जगाला अहिंसा, शांतीचा संदेश दिला- मोदी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, July 4, 2020

धर्मचक्र दिन Live: बुद्धाने जगाला अहिंसा, शांतीचा संदेश दिला- मोदी

https://ift.tt/2C7v9hW
नवी दिल्ली: संस्कृती मंत्रालयाच्या देखरेखीखाली आज शनिवारी आंतरराष्ट्रीय बौद्ध परिसंघाद्वारे (IBC) धर्मचक्र दिनाच्या रुपात साजरी केली जाते. आज आषाढ पौर्णिमेलाच तथागत गौतम बुद्धाने आपल्या पहिल्या ५ शिष्यांना धर्माचा प्रथम उपदेश दिला. या दिनाला असे म्हणतात. हा दिवस संपूर्ण जगात बौद्ध लोक दरवर्षी हा दिवस धर्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा करतात. तर हिंदू धर्मीय हा दिवस म्हणून साजरा करतात. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात धर्मचक्र प्रवर्तन दिनाचे थोड्याच वेळात उद्घाटन करतील. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील जनतेला संबोधित करतील. पाहुयात, काय म्हणत आहेत पंतप्रधान... Live अपडेट्स... >> बुद्धाने सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाने अनेक समाज, अनेक देश आज मार्गक्रमण करत आहेत. या मार्गातून करूणा आणि दयेचा मार्ग अधोरेखित होतो. बुद्धाचा मार्ग आपल्याला आपल्या विचारातील आणि आचारातील साधेपणा शिकवतो- मोदी >> 'अत्त दीपो भव' हा महान संदेश बुद्धांनी दिला. याचा अर्थ दुसऱ्यावर अवलंबून न राहता आपल्या जीवनाचे व्यवस्थापण आपल्याला स्वत:ला करायचे आहे- मोदी >> भगवान बुद्धांनी जगाला जगण्याचा मार्ग दाखवला- मोदी >> बुद्धाने जगाला अहिंसा आणि शांतीचा संदेश दिला- मोदी >> जग आज अनेक आव्हानांशी लढत आहे- मोदी >> भगवान बुद्धांचा संदेश आजही प्रासंगिक आहे- मोदी >> मी आषाढ पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा देतो. हा दिवस गुरू पौर्णिमा म्हणूनही साजरा केला जातो. आजचा दिवस हा आपल्याला ज्ञान देणाऱ्या आपल्या गुरूंना स्मरण करण्याचा दिवस आहे. याच उद्देशाने आपण आज भगवान बुद्धांना अभिवादन करतो- मोदी. >> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन सुरू >> राष्ट्पती रामनाथ कोविंद यांनी केले धर्मचक्र प्रवर्तन कार्यक्रमाचे उदघाटन. >> धर्मचक्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे थोड्याचवेळात करणार संबोधन >> थोड्याच वेळात राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद करणार धर्मचक्र प्रवर्तन दिनाचे उद्घाटन करणार >> वैशाख पौर्णिमेच्या दिवशी ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर तथागत गौतम बुद्धांनी आषाढ पौर्णिमेच्या दिवशी वाराणसीजवळील सारनाथ येथे आपल्या नव्या धर्माचे पहिले प्रवचन दिले. त्यावेळी त्यांचे पहिले ५ शिष्य उपस्थित होते. >> भारतासह जगभरातील बौद्ध धर्मीय हा दिन मोठ्या उत्साहात धर्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा करतात. या दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. >> जगभरातील विविध भागात आषाढ पौर्णिमेला धर्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो.