उद्धव ठाकरेही त्याच वाटेनं पुढं चालले आहेत: शरद पवार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, July 11, 2020

उद्धव ठाकरेही त्याच वाटेनं पुढं चालले आहेत: शरद पवार

https://ift.tt/3gLN4tf
मुंबई: 'बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात काँग्रेसबद्दल विद्वेष नव्हता. काही धोरणांच्या बाबतीत त्यांची स्पष्ट मतं होती. पण शिवसेना ही काँग्रेसच्या कायमच विरोधात असावी असा त्याचा अर्थ नव्हता. कमी-अधिक प्रमाणात हेही आज त्याच वाटेनं पुढं चालले आहेत,' असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी व्यक्त केलं आहे. वाचा: शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ''साठी शरद पवार यांनी मॅरेथॉन मुलाखत दिली आहे. शिवसेनेचे खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक यांनी घेतलेल्या या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसिद्ध झाला. त्यात पवार यांनी लॉकडाऊनपासून आघाडी सरकारच्या रिमोट कंट्रोलपर्यंतच्या अनेक प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिली आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून विरोधक भूतकाळातील दाखले देत शिवसेनेवर टीका करत असतात. शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं. पण तो काँग्रेसच्या पाठिंब्यावर व्हावा हे त्यांनी कधीच मान्य केलं नसतं, अशी टीका भाजपचे नेते करतात. याच अनुषंगानं शरद पवार यांनी शिवसेना व काँग्रेसच्या संबंधांवरही भाष्य केलं आहे. वाचा: 'बाळासाहेब ठाकरे यांचा काँग्रेसशी संघर्ष जरूर होता. पण तो कायमचाच संघर्ष होता, असं समजण्याचं कारण नाही. उलट बाळासाहेब ठाकरे हे असे एकमेव नेते होते की ज्यांनी आपल्या पक्षाच्या राजकीय भवितव्याची तमा न बाळगता इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीला पाठिंबा दिला होता. संपूर्ण देश इंदिरा गांधी यांच्या विरोध असताना त्यांनी ही भूमिका घेतली होती. आमच्यासाठी तो धक्काच होता. एवढंच नव्हे तर निवडणुकीत महाराष्ट्रात आमचे उमेदवार उभे करणार नाही, अशी भूमिका शिवसेनेनं घेतली होती. याचं कारण त्यांच्या मनात काँग्रेसबद्दल तसा विद्वेष नव्हता. उद्धव ठाकरेही त्याच वाटेनं चालले आहेत,' असं पवार म्हणाले. 'माझे सुद्धा शिवसेनेशी काही गोष्टींवर वैचारिक मतभेद होते. पण सुसंवाद होता. आताच्या नेतृत्वापेक्षाही आम्हा सर्वांचा बाळासाहेबांशी उत्तम सुसंवाद होता. वैयक्तिक संबंधांच्या राजकीय परिणामांची त्यांनी कधी भीती बाळगली नाही,' असंही पवार म्हणाले.