
मुंबई : जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांनी देशात सोन्याचा भाव विक्रमी सस्तरावर गेला आहे. बुधवारी दिल्लीत सोने १० ग्रॅमला ४९००० रुपयांवर गेले. तर चांदीने किलोला ५०९०० रुपयांपर्यंत मजल मारली आहे. कमॉडिटी बाजारात सोने प्रती दहा ग्रॅम ४८९८२ रुपये आहे. जागतिक बाजारात सोन्याने १८०७ डॉलर प्रती औंस इतका स्तर गाठला आहे. २०११ नंतर पहिल्यांदाच सोने १८०० डॉलरवर गेले आहे. नवी दिल्लीः देशातील करोना रुग्णांची संख्या ६ लाखांवर गेली आहे. राजधानी दिल्लीत गेल्या २४ तासांत करोनाचे २४४२ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे दिल्लीतील करोना रुग्णांची एकूण संख्याही ८९ हजारांवर गेली आहे. तर महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ५५३७ नवे रुग्ण आढळले आहेत. मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांच्या दर पत्रकानुसार गुरुवारी मुंबईत पेट्रोलचा भाव प्रती लीटर ८७.१९ असून दर ७८.८३ रुपयांवर कायम आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा भाव ८०.४३ रुपयांवर स्थिर आहे. डिझेलचा भाव ८०.५३ रुपये प्रती लिटर आहे. चेन्नईत पेट्रोल ८३.६३ रुपये आणि कोलकात्यात ८२.१० रुपये झाले आहे. चेन्नईत डिझेल ७७.७२ रुपये आणि कोलकात्यात ७५.६४ रुपये झाले आहे.