पंतप्रधान मोदी अचानक लडाखला पोहोचले, CDS बिपिन रावतही उपस्थित - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, July 3, 2020

पंतप्रधान मोदी अचानक लडाखला पोहोचले, CDS बिपिन रावतही उपस्थित

https://ift.tt/2Bwu9Uk
लेह: भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक लेहला भेट दिली आहे. आज शुक्रवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी लेहमधील निमू येथे जात त्यांनी जवानांची भेट घेतली. त्यापूर्वी सैन्यदलाचे प्रमुख बिपिन रावत येथे दौऱ्यावर येणार असल्याचे वृत्त होते. पंतप्रधान मोदी यांच्या सोबत सैन्यदल प्रमुख बिपिन रावत आणि लष्कर प्रमुख एम. एम. नरवणे हे देखील उपस्थित आहेत. मे महिन्यापासून भारत-चीनदरम्यान तणाव निर्माण झाला आहे. या काळात अचानक लेहला भेट देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. या पूर्वी शुक्रवारी केवळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हेच लेहचा दौरा करणार असल्याचे वृत्त होते. मात्र, गुरुवारी त्यांचा हा दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आता केवळ बिपिन रावत हेच लेहचा दौरा करतील असे सांगण्यात आले होते. पंतप्रधान मोदी लेहमध्ये पोहोचल्यानंतर त्यांचे एक छायाचित्र सर्वत्र प्रसिद्ध झाले. या छायाचित्रात त्यांच्यासोबत सैन्यदल प्रमुख बिपिन रावत आणि लष्कर प्रमुख नरवणे हे देखील दिसत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी लडाखमधील ज्या ठिकाणाला भेट दिले त्या ठिकाणाचे नाव नीमू असे आहे. नीमू हे लेहपासून द्रासच्या देशेला आहे. मोदी आज सकाळीच लडाखला पोहोचले. तेथे पंतप्रधानांनी लष्कर, हवाईदल आणि आयटीबीपीच्या जवानांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. हे सीमेवरील फॉरवर्ड लोकेशन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना येथे लष्करी अधिकाऱ्यांनी घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली. त्यावेळी तेथे मोठ्या संख्येने जवान उपस्थित होते.