अमेरिका: भारतीय वंशाच्या कमला हॅरीस उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, August 12, 2020

अमेरिका: भारतीय वंशाच्या कमला हॅरीस उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार

https://ift.tt/2XSg77L
वॉशिंग्टन: अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. डेंमोक्रेटिक पक्षाच्यावतीने उपराष्ट्रापतीपदासाठी भारतीय वंशाच्या यांना उमेदवारी जाहीर केली आहे. डेमोक्रेटीक पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडन यांनी ही माहिती दिली आहे. जो बायडन यांनी कमला हॅरीस यांना बहाद्दूर योद्धा म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, कमला हॅरीस या कॅलिफोर्नियाच्या अॅटर्नी जनरल म्हणून काम करत असताना त्यांची कामाची पद्धत पाहिली आहे. त्यांनी अनेक मोठ्या बँकांना आव्हान दिले होते. काम करणाऱ्या लोकांची त्यांनी मदत केली आहे. महिला व बालकांना शोषणापासून त्यांनी वाचवले आहे. मला त्यावेळीदेखील मला त्यांचा अभिमान वाटत होता आणि आताही अभिमान वाटत आहे. कमला हॅरीस आता माझ्या सहकारी असतील याचा अभिमान वाटत असल्याचे बायडन यांनी म्हटले. वाचा: कॅलिफोर्नियाच्या सिनेटर असलेल्या कमला हॅरीस या राष्ट्राध्यक्षपदासाठी उत्सुक होत्या. मात्र, प्रायमरीमध्ये त्या बायडन आणि सँडर्स यांच्या तुलनेत मागे पडल्या होत्या. राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारी स्पर्धेतून कमला हॅरीस बाहेर पडल्यानंतर उपराष्ट्रपतीपदासाठी त्यांच्याच नावाची चर्चा सुरू होती. कमला हॅरीस यांनी उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी जाहीर केल्याबद्दल आनंद व्यक्त करत बायडन यांचे आभार मानले आहे. बायडन यांच्या विजयासाठी आपण सर्व प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. बायडन हे अमेरिकन नागरिकांना एकत्र आणू शकतात. आपण सर्वांनी नागरिकांसाठी, त्यांच्या हक्कासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावले आहे. बायडन यांच्या नेतृत्वात आदर्शवत वाटेल असा अमेरिका आपल्याला घडवायचा असल्याचे त्यांनी सांगितले. वाचा: वाचा: डोनाल्ड ट्रम्प संतप्त डेमोक्रेटिक पक्षाने कमला हॅरीस यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार घोषित केल्यानंतर अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला आहे. कमला हॅरीस यांच्या उमेदवारीमुळे मी आश्चर्यचकित झालो आहे. कमला हॅरीस यांनी सुप्रीम कोर्टाच्याही न्यायाधीशांचा अपमान केला असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. कमला हॅरीस या अतिशय निकृष्ट उमेदवार असल्याचा हल्लाबोल ट्रम्प यांनी केला आहे. कमला हॅरीस यांनी प्रायमरी निवडणुकीच्या वेळीही अतिशय वाईट कामगिरी केली होती. उपराष्ट्रपती माइक पेन्स हे कमला हॅरीस यांच्यापेक्षाही अतिशय उत्तम असल्याचे त्यांनी सांगितले.