तेलअवीव: इस्रायलमधील इलट शहर सामूहिक बलात्काराच्या घटनेने हादरले आहे. येथील एका हॉटेलात १६ वर्षीय मुलीवर ३० जणांनी सामूहिक बलात्कार केला. या अमानवीय घटनेने इस्रायलमध्ये खळबळ उडाली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी 'मानवतेविरोधातील गुन्हा' अशी प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांनी आतापर्यंत दोघांना अटक केली आहे. आरोपींनी मुलीचे आक्षेपार्ह व्हिडिओ शूट केले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. घटना घडली त्यावेळी पीडित मुलगी नशेत होती, असे सांगितले जात आहे. या मुलीनेच घडलेली घटना पोलिसांना सांगितली. पोलिसांनी एका संशयिताकडे चौकशी केली असता, करणारे अनेक जण होते, असे त्याने सांगितले. मात्र, मुलीच्या सहमतीनेच शरीरसंबंध ठेवल्याचा दावा त्याने केला आहे. आरोपींनी मुलीचा आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ शूट केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. मित्रांसोबत दारू प्यायल्याचा दावा पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलगी ही हॉटेलची गेस्ट नव्हती. ती मित्रांसोबत दारू प्यायल्यानंतर वॉशरूममध्ये गेली होती. त्यानंतर मुलीला काही जण हॉटेलच्या खोलीत घेऊन गेले. हे सर्व आरोपी एकमेकांना ओळखतही नव्हते. एका संशयिताने सांगितले की, एकेक आरोपी खोलीत गेला आणि अशा ३० जणांनी तिच्यावर बलात्कार केला. वैद्यकीय मदत करण्याच्या बहाण्याने आरोपी एकेक करून खोलीत गेले होते. नशेत असल्याचा गैरफायदा घेऊन त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. मुलीच्या वैद्यकीय अहवालाची तपास करणाऱ्या पोलिसांना प्रतीक्षा आहे. या घटनेने इस्रायलच्या पंतप्रधानांना मोठा धक्का बसला आहे. हा मानवतेविरोधातील गुन्हा आहे. त्याचा तीव्र निषेध करत असून, आरोपींवर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.