नवी दिल्ली: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज ७५ वी जयंती () आहे. या निमित्त काँग्रेसचे माजी अध्यक्ष यांनी आपले पिता दिवंगत राजीव गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे ( pays homage). राजीव गांधी हे दूरदृष्टीचे नेते होते, तसेच ते काळाच्याही पुढे होते, असे वर्णन राहुल गांधी यांनी केले आहे. मात्र, याहीपेक्षा ते उदार आणि प्रेमाने भरलेले व्यक्तीमत्व होते, असे राहुल गांधी म्हणाले. राजीव गांधी हे माझे पिता होते यामुळे मी स्वत:ला अतिशय भाग्यशाली समजत असून मला त्यांचा अभिमान आहे. आम्ही त्यांना आज आणि दररोज आठवतो, असे राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले. यांनी वाहिली श्रद्धांजली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. राजीव गांधी यांचा जन्म २० ऑगस्ट, १९४४ मध्ये झाला होता. व्यवसायाने ते पायलट होते. त्यांच्या आई आणि तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या शीख कट्टरतावाद्यांनी केल्यानंतर अचानक राहुल गांधी यांना राजकारणात यावे लागले. ते देशाचे ९ वे पंतप्रधान बनले. सन १९९१ मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांची निघृण हत्या करण्यात आली.