नवी दिल्ली : करोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेले थिएटर्स आणि सिनेमा हॉल पुन्हा कधी सुरू होणार? हे काही सांगता येत नाही परंतु, आता मात्र एनसीआर भागात ''चा पर्याय सुरू झालेला दिसतोय. त्यामुळे, आता लोकांना टीव्ही आणि कम्प्युटर किंवा मोबाईल स्क्रीनशिवाय मोठ्या स्क्रीनवरही पाहता येणं शक्य होणार आहे. काय आहे 'ड्राईव्ह इन सिनेमा'? 'ड्राईव्ह इन सिनेमा'मध्ये पाळताना लोक आपल्या गाडीतच बसून समोर भल्या मोठ्या स्क्रिनवर सुरू असणाऱ्या सिनेमाचा आनंद घेऊ शकतात. १९७० च्या दशकात अहमदाबाद आणि मुंबईत ड्राईव्ह इन सिनेमा सुरू करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु, हा प्रयत्न फसला. सध्या भारतात सहा ड्राईव्ह इन सिनेमा आहेत. यापैंकी दोन गुरुग्राममध्ये आहेत. सोशल डिस्टन्सिंग गेल्या रविवारी एनसीआरमध्ये गेल्या पाच महिन्यांत पहिल्यांदाच मुव्ही स्क्रीनिंग या पद्धतीनं करण्यात आली. आपापल्या गाडीत बसणाऱ्या लोकांनी मास्कसहीत सोशल डिस्टन्सिंगचही पालन केलं. हा सिनेमा पाहण्यासाठी जवळपास ३० गाड्या इथं दाखल झाल्या होत्या. यामध्ये, व्हिडिओ ३० फूट लांब स्क्रीनवर दिसतो तर ऑडिओ थेट कारमध्ये पोहचतो. वाचा : वाचा : वाचा : पुढचा शो कधी ? इथं पुढचा ड्राईव्ह इन सिनेमा २२ आणि २३ ऑगस्ट रोजी होणार आहे. यासाठी एका शोचं तिकीट साधारणत: १२०० रुपये आहे. २२ ऑगस्ट रोजी 'ला ला लँड' आणि २३ ऑगस्ट रोजी 'जब वी मेट' सिनेमा दाखवण्यात येणार आहे. सायंकाळी ७.३० वाजता हा सिनेमा सुरू होईल गुरुग्रामच्या सनसेट सिनेमा क्लबच्या साहिल कपूर यांच्या म्हणण्यानुसार, मोठ्या स्क्रीनवर सिनेमा पाहण्यासाठी हा पर्याय अत्यंत सुरक्षित आहे. यात १०० टक्के संपर्करहित अनुभव मिळतो. जनतेच्या वाढत्या मागणीनंतर सप्टेंबर महिन्यात प्रत्येक विकेन्डला स्क्रीनिंग करण्याचा विचार सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलंय. वाचा : वाचा : वाचा :