हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्या संजय दत्तला मान्यताने मारली घट्ट मिठी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, August 19, 2020

हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्या संजय दत्तला मान्यताने मारली घट्ट मिठी

https://ift.tt/3kYcO8L
मुंबई- बॉलिवूड स्टार नुकताच कोकिलाबेन इस्पितळात पुढील उपचारांसाठी रवाना झाला. ज्यावेळी त्याने घराबाहेर पाऊल ठेवलं तेव्हा त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना पापाराझीने कॅमेऱ्यात कैद केले. पत्नी मान्यता दत्तने आपल्या स्टेटमेन्टमध्ये स्पष्ट केलं की संजूवर प्राथमिक उपचार मुंबईतच होतील. याचसाठी तो कोकिलाबेन इस्पितळात सातत्याने जात आहे. आता त्याचे घराबाहेरचे पत्नी आणि बहिणींसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. संजूसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची फौज मान्यता म्हणाली की, 'संजयचे प्राथमिक उपचार मुंबईतच पूर्ण होतील. कोविडची स्थिती सुधारल्यावर ते भविष्यात प्रवास करण्याचा विचार करतील. सध्या कोकिलाबेन इस्पितळातील तज्ज्ञ डॉक्टर त्याच्यावर उपचार करत आहेत. संपूर्ण कुटुंब आलं एकत्र जेव्हा संजय इस्पितळात जाण्यासाठी निघाला होता तेव्हा त्याची पत्नी आणि बहिणी प्रिया आणि तसेच कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते. सर्वांनी बाळगली होती दक्षता कोविड- १९ साठी घ्यावी लागणारी सर्व काळजी दत्त कुटुंबियांनी घेतली होती. यावेळी सर्वांनी मास्क लावला होता. छायाचित्रकारांना केलं थम्ब्स अप मान्यताशिवाय संजयच्या बहिणी प्रिया आणि नम्रता दत्तादेखील घराबाहेर दिसल्या. या दरम्यान संजयने छायाचित्रकारांना अभिवादन करत थम्ब्स अप केलं. एकमेकांचा हात घट्ट पकडला होता संजय आणि मान्यताने घरातून बाहेर पडताना एकमेकांचा हात घट्ट पकडला होता. संजय गाडीत बसताना दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. संजयला रिपोर्टनुसार, संजयला फुफ्फुसांचा कर्करोग आहे. सोशल मीडियावर त्याने सांगितलं होतं की तो कामातून ब्रेक घेत आहे. खोटे अनुमान लावू नका संजयने सांगितलं होतं की तो ट्रीटमेन्टसाठी ब्रेक घेत असून त्यासंबंधीचे स्वतःचे अनुमान लावू नका. सडक २ मध्ये दिसणार संजय संजय दत्तच्या सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर तो सडक २ मध्ये दिसणार आहे. दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या या सिनेमात आलिया भट्ट, आदित्‍य रॉय कपूर, पूजा भट्ट या कलाकारांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. संजूकडे आहेत अनेक नवीन प्रोजेक्ट संजय दत्तकडे सध्या अनेक नवीन प्रोजेक्ट आहेत. यात 'भुज: प्राइड ऑफ इंडिया', 'केजीएफ २', 'शमशेरा' या सिनेमांची नावं घेता येईल. २०१९ मध्ये या सिनेमांत केलं होतं काम गेल्यावर्षी संजय दत्तने 'पानीपत', 'कलंक', 'प्रस्‍थानम' या सिनेमांमध्ये काम केलं होतं. या सिनेमातील त्याच्या अभिनयाचं कौतुकही झालं.