नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून आता चार दिवस होत आले. तरी धोनीच्या निवृत्ती संदर्भातील चर्चा अद्याप काही कमी झाल्या नाहीत. गेल्या वर्ष भरापासून क्रिकेटपासून दूर होता. तरी चाहत्यांना आशा होती की तो पुन्हा मैदानावर दिसेल. आयपीएल नंतर भारतीय संघातून टी-२० वर्ल्ड कपनंतरच धोनी निवृत्ती घेईल असे वाटत होते. पण त्याआधीच धोनीने निवृत्ती जाहीर केली. धोनीच्या निवृत्तीसंदर्भात बोलताना टीम इंडियातील एका खेळाडूने त्याचे करिअर कोणी संपवले याचा खुलासा केलाय. वाचा- एका टीव्ही कार्यक्रमा दरम्यान बोलताना म्हणाला, धोनी अजून देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकतात. माझी तर इच्छा आहे की त्याने खेळावे. तो जेव्हा मैदानात असतो तेव्हा माझे ५० टक्के काम कमी होते. धोनीला आधीचपासूनच कळते की खेळपट्टी कशी असेल. त्याचा आम्हाला फायदा होतो. धोनी नसले तर आम्हाला खेळपट्टी समजण्यासाठी आणखी दोन ओव्हर लागतात. वाचा- धोनीने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यावर चहल म्हणाला, धोनीचे करिअर करोना व्हायरसने संपवले. करोना नसता तर तो निश्चितपणे टी-२० वर्ल्ड कप खेळला असता. कुलदीप यादव आणि माझ्या करिअरमध्ये धोनीचे खुप मोठे योगदान आहे. एका मोठ्या भावा प्रमाणे धोनीने आम्हाला अनेक बारकावे सांगितले. काही चूका झाल्या तर तो समजावून सागायचा. धोनी विकेटच्या मागे असेल तर त्याचा सर्वात जास्त फायदा आम्हालाच होत असे. वाचा- बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जचे मालक एन श्रीनिवासन म्हणाले की, दोन वेळा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या धोनीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिळवण्यासारखे काही शिल्लक राहिले नाही. धोनीच्या निवृत्तीने एका युगाचा अखेर झाला. त्याने २००७ चा टी-२० वर्ल्ड कप, २०११चा वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद मिळवले. एक शानदार कर्णधार, विकेटकिपर आणि आक्रमक फलंदाज असे सर्व गुण त्याच्या होते. वाचा- धोनी पुन्हा भारतासाठी खेळणार नाही याचे दु:ख आहे. पण तो चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळेल याचा आनंद असल्याचे श्रीनिवासन म्हणाले.