नांदेडमध्ये चिंता! चार आमदारांनंतर आता खासदारालाही करोना - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, August 7, 2020

नांदेडमध्ये चिंता! चार आमदारांनंतर आता खासदारालाही करोना

https://ift.tt/3fAlPRu
नांदेड: जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना करोनाचा विळखाच पडला असून चार आमदारानंतर आता खासदारालाही करोनाची लागण झाली आहे. नांदेडचे भाजपचे खासदार यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. खासदार चिखलीकर यांचे सुपुत्र व जिल्हा परिषदेचे सदस्य प्रवीण पाटील यांना अलीकडेच करोनाची बाधा झाली होती. त्यानंतर प्रताप पाटील यांचीही करोना चाचणी करण्यात आली. त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर औरंगाबादमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. प्रवीण पाटील हे देखील औरंगाबादमध्येच उपचार घेत आहेत. वाचा: राज्यात सुरुवातीच्या काळात नांदेड हा जिल्हा ग्रीन झोन म्हणून घोषित करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच तिथं रुग्ण सापडू लागले. सर्वसामान्यांबरोबर लोकप्रतिनिधींनाही लागण होऊ लागली. राज्याचे माजी मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना सर्वप्रथम करोनाने गाठले होते. मुंबईतील उपचारानंतर ते करोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे, अमरनाथ राजूरकर, माधव जळगावकर यांनाही करोनाची लागण झाली होती. यापैकी जळगावकर यांच्या अजूनही उपचार सुरू असून हंबर्डे व राजूरकर हे करोनामुक्त झाले आहेत. वाचा: करोनाची साथ आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनच्या काळात लोकप्रतिनिधी विविध कामांनिमित्तानं मतदारसंघामध्ये फिरत आहेत. बैठका व अन्य जबाबदाऱ्यांमुळं त्यांचा अधिकारी व पोलिसांशी संपर्क येत आहे. त्यातून लोकप्रतिनिधींना करोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे. नांदेड जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या २६१८ झाली असून त्यापैकी १५७८ जणांवर उपचार सुरू आहेत. तर, ९४४ जणांनी करोनावर मात केली असून आतापर्यंत ९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.