
सांगली: सेंटरमध्ये हातचालखीने कार्ड बदलून खात्यातले पैसे काढणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे. सुभाष जाधव असे या शातीर चोराचं नाव असून त्याच्याकडून १०१ एटीएम कार्ड आणि तीन लाखांच्या रोकडसह साडे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून एटीएम कार्ड सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे पैसे काढून देण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांना चुना लावण्याचा प्रकार सुरु होता. अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या ठगसेन चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. सुभाष जाधव,वय 37 असे,या चोरट्याचे नाव असून तो विटाच्या चंद्रसेननगर येथील राहणार आहे. हेही वाचा - हातचलाखीने फसवणूक करणारया या चोरट्याच्या तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला जाधव हा तासगावहुन सांगलीकडे जाणार असल्याचे माहिती मिळाली,त्यानुसार पथकाने माधवनगर येथील तासगावहुन येणाऱ्या रोडवर सापळा रचून जाधव याला ताब्यात घेतले.त्यानंतर त्याची सखोल चौकशी केली असता,त्याने वेगवेगळ्या ठिकाणी एटीएम सेंटर मध्ये पैसे काढून देण्याच्या बहाण्याने हातचलाखीने कार्ड बदलून ग्राहकांच्या खात्यावरील पैसे परस्पर काढले,असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्याकडून वेगवेगळ्या बँकेचे १०१ एटीएम कार्ड, ३ लाख रोकड आणि एक दुचाकी असे साडे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करत सुभाष जाधव याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ६ गुन्हे उघडकीस आले असून अधिक तपास सुरु असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी दिली आहे. हेही वाचा -