लोक बेरोजगार, अर्थव्यवस्था कोसळत असताना 'या' व्यक्तीची संपत्ती ८७ अब्ज डॉलरने वाढली - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, August 27, 2020

लोक बेरोजगार, अर्थव्यवस्था कोसळत असताना 'या' व्यक्तीची संपत्ती ८७ अब्ज डॉलरने वाढली

https://ift.tt/34C2UUD
नवी दिल्ली: विविध देशांच्या आर्थिक विकास दरात (GDP) होणारी घसरण आणि लाखो लोकांचा रोजगार करोना व्हायरसमुळे जात असताना जगातील आघाडीच्या श्रीमंत व्यक्तींची संपत्तीत चौपट वेगाने वाढत आहे. अमेरिकन शेअर बाजारात सलग चार सत्रात तेजी असल्याने जगातील टॉपच्या श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. वाचा- जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अमेझॉनचे संस्थापक यांची संपत्ती बुधवारी २०० अब्ज डॉलरच्या पुढे गेली. याचे कारण म्हणजे बुधवारी त्यांच्या कंपनीचा शेअर विक्रमी स्तरावर पोहोचला. तर त्यांची माजी पत्नी आता जगातील सर्वात श्रीमंत महिला होण्याच्या जवळ पोहोचल्या आहेत. मॅकेंजी यांच्यापुढे आता फक्त Francoise Bettencourt Meyers या आहेत. वाचा- शेअर बाजारातील तेजीमुळे अॅलन मस्क यांची संपत्ती १०० अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे. मस्क आता १०० अब्ज डॉलर क्लबमध्ये सामील झाले आहे. ब्लूमबर्ग बिलिनिअर्स इंडेक्सनुसार टेस्ला इंकचे शेअरमध्ये बुधवारी आलेल्या तेजीमुळे त्यांची संपत्ती १०१ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. टेक कंपन्यांचे शेअर S&P 500 आणि Nasdaq इंडेक्सेजमध्ये सलग चौथ्या सत्रात तेजीत होते. फेडरल रिझर्व्हने शॉर्ट टर्म इंट्रेस्ट रेट कमीत कमी पाच वर्षासाठी शून्यच्या आसपास ठेवण्याची शक्यता आहे. या वृत्तानंतर अमेरिकन शेअर बाजारात तेजी आली. वाचा- या वर्षात जगातील आघाडीच्या ५०० श्रीमंत व्यक्तींची संपत्ती आतापर्यंत ८०९ अब्ज डॉलरने म्हणजेच १४ टक्क्यांनी वाढली आहे. दुसऱ्या बाजूला करोना व्हायरसमुळे सर्व देशांचे जीडीपी घसरत आहेत आणि लाखो लोक बेरोजगार होत आहेत. मस्क यांची संपत्ती या वर्षी ७३.६ अब्ज डॉलरने तर बेजोस यांची संपत्ती ८७.१ अब्ज डॉलरने वाढली आहे. फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झुकरबर्ग यांची संपत्ती याच महिन्यात १०० अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. बुधवारी त्यांची संपत्ती ८.५ अब्ज डॉलरने वाढली. वाचा- मुकेश अंबानींना देखील फायदा शेअर बाजारातील तेजीचा फायदा फक्त अमेरिकेतील टेक कंपन्यांना झालेला नाही. तर भारतातील आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी हे देखील फायद्यात आहेत गेल्या महिन्यात ते जगातील पाचव्या क्रमांकाचे श्रींमत व्यक्ती होते. या स्तरावर पोहोचणारे ते पहिले आशियायी व्यक्ती होते. रिलायन्सच्या शेअरमध्ये झालेल्या वाढीमुळे त्यांची संपत्ती या वर्षी २२.५ अब्ज डॉलरने वाढली आहे. अर्थात नंतर शेअर बाजारात आलेल्या घसरणीमुळे ते श्रीमंतांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर घसरले.