नवी दिल्ली: आज गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्वच्छतेबाबतच्या 'स्वच्छ सर्वेक्षण-२०२०' च्या निकालांची आज घोषणा करतील. या वेळी स्वच्छतेबाबत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरांना पुरस्कार दिले जाणार आहेत. या बरोबरच पंतप्रधान मोदी देशातील काही 'स्वच्छाग्रही' आणि सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधतील. देशाच्या नागरिकांमध्चे स्वच्छतेबाबत भागीदारी वाढवण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षणाची सुरुवात करण्यात आली होती. गेल्या २८ दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आले आहे. गुरुवारी आयोजित होणाऱ्या स्वच्छ महोत्सवात स्वच्छता सर्वेक्षण अहवालाव्यतिरिक्त स्वच्छ सर्वेक्षण इनोव्हेशन, स्वच्छ सर्वेक्षण सोशल मीडिया आणि गंगेच्या किनावरील शहरांवरील अहवाल देखील प्रसिद्ध केले जाणार आहेत. सलग तीन वर्षे इंदूर हे शहर होते अव्वल स्वच्छता सर्वेक्षणाच्या पहिल्याच वर्षी भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा किताव मैसूर या शहराने पटकावला होता . त्यानतर सतत तीन वर्षे, म्हणजेच सन २०१७, २०१८ आणि २०१९ मध्ये मध्य प्रदेशातील इंदूर हे शहर देशात सर्वात स्वच्छ शहर ठरले होते. क्लिक करा आणि वाचा- गेल्या वर्षी शहरांना सात प्रकारांमध्ये दिले पुरस्कार सर्वात स्वच्छ शहर : इंदूर सर्वात स्वच्छ राजधानी : भोपाळ सर्वात स्वच्छ मोठे शहर : अहमदाबाद (१० लाखांहून अधिक लोकसंख्या) सर्वात स्वच्छ मध्यम लोकसंख्येचे शहर: उज्जैन (३ ते १० लाखांची लोकसंख्या) सर्वात स्वच्छ छोटे शहर : एनडीएमसी दिल्ली (३ लाखांहून कमी लोकसंख्या) सर्वात स्वच्छ कंटोनमेंट: दिल्ली कँट सर्वात स्वच्छ गंगा टाउन : गोचर, उत्तराखंड क्लिक करा आणि वाचा ही बातमी- क्लिक करा आणि वाचा ही बातमी-