पुलवामामध्ये तीन दहशतवादी ठार, एका जवानानंही गमावले प्राण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, August 29, 2020

पुलवामामध्ये तीन दहशतवादी ठार, एका जवानानंही गमावले प्राण

https://ift.tt/31EJYme
: आणि यांच्यात शुक्रवार-शनिवारच्या रात्री उशिरापासून सुरू झालेली चकमक अजूनही सुरू आहे. पुलवामाच्या भागात ही आहे. आत्तापर्यंत सुरक्षा यंत्रणेनं तीन दहशतवाद्यांना ठार केल्याचं समजतंय. परंतु, या चकमकीत एका जवानालाही आपले प्राण गमवावे लागले. काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आणि सुरक्षा दलाकडून संयुक्तरित्या हे ऑपरेशन राबवण्यात येतंय. काश्मीर झोन पोलिसांनी दहशतवाद्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. वृत्तसंस्था एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, पुलवामाच्या जदुरा भागात एन्काऊन्टरला सुरुवात झाली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. अद्याप या घटनेची सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही. वाचा : वाचा : मृत दहशतवादी जम्मू-काश्मीर पोलिसांचा माजी कर्मचारी यापूर्वी, शुक्रवारी एका चकमकीत शोपियाँ जिल्ह्यातील किलौरा भागात चार दहशतवादी टिपल्याचं काश्मीर पोलिसांचे महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितलं होतं. यावेळी, एक दहशतवाद्याला जिवंत ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळालंय. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये एक शकूर पार्रे हा जम्मू-काश्मीर पोलिसांचा माजी कर्मचारी आणि अल - बद्र संघटनेचा जिल्हा कमांडर होता. जिल्ह्याच्या किलुरा भागात दहशतवादी उपस्थित असल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलाच्या हाती लागली होती. त्यानंतर या परिसराला घेराव घालून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं. वाचा : वाचा :