मुंबई: सुशांत प्रकरण सीबीआयला देण्याची मागणी केल्यानंतर खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांनी फटकारल्यानंतरही यांनी सूचक ट्विट केलं आहे. पार्थ यांनी सत्यमेव जयते, असं सूचक ट्विट केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून त्यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. अभिनेता सुशांतसिंह प्रकरण सीबीआयकडे देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच पार्थ यांनी सत्यमेव जयते असं ट्विट केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सुशांतप्रकरणात शरद पवार यांनी फटकारल्यानंतर पार्थ पवार नाराज झाले होते. त्यामुळे ते मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात होती. पक्षातून आणि कुटुंबातून त्यांची समजूतही काढली जात होती. पवारांनी झापल्यानंतरही पार्थ यांनी कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केल्याने पार्थ यांची ही भूमिका पक्षविरोधी असल्याचं बोललं जात असून पक्ष त्याबाबत काय भूमिका घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.