रामदेव बाबा IPLसाठी देणार ४४० कोटी? कसे ते वाचा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, August 10, 2020

रामदेव बाबा IPLसाठी देणार ४४० कोटी? कसे ते वाचा

https://ift.tt/3ir9wsM
नवी दिल्ली: विवो कंपनीने IPLच्या १३व्या हंगामाच्या प्रायोजकत्वातून माघार घेतल्याने बीसीसीआयकडून नव्या प्रायोजकाचा शोध सुरू आहे. यासाठी जगभरातील मोठ्या कंपन्याची नावे चर्चेत आहेत. पण आता एक नवे नाव समोर येत आहे. भारत-चीन तणावामुळे विवोने मुख्य प्रायोजकम्हणून माघार घेतली. त्यानंतर बीसीसीआयने याची घोषणा केली. विवो प्रत्येक वर्षी बीसीसीआयला ४४० कोटी रुपये इतकी रक्कम देते. बीसीसीआय आणि विवो यांचा करार २०२२ सालापर्यंत होता. करोना व्हायरसच्या काळात बाजाराची परिस्थितीत खराब असताना एका वर्षासाठी बीसीसीआयला विवो इतके रक्कम नवी कंपनी देणार का हा मोठा प्रश्न आहे. वाचा- आयपीएलसाठी या वर्षी अमेझॉन, ड्रीम ११, बायजूज, रिलायन्स जिओ आदी कंपन्या स्पर्धेत असल्याचे समजते. आता या कंपन्यांसोबत योगगुरू यांची पतंजली कंपनीचा देखील समावेश असल्याचे कळते. कंपनीने स्वत: या वृत्ताला दुजोरा दिला आहे. वाचा- इकॉनॉमिक्स टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार या वर्षी होणाऱ्या आयपीएलच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही पतंजलीला जागतिक पातळीवर घेऊन जाण्याचा विचार करत आहोत. त्यामुळेच आयपीएलचे प्रायजोकत्व मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे कंपीने प्रवक्ता एस के तिजारावाला यांनी सांगितले. वाचा- कोण कोण आहे स्पर्धेत आयपीएलचा हंगाम आणि भारतात सण आणि उत्सवांचा कालावधी जवळ येत आहे. त्यामुळे इ-कॉमर्समधील आघाडीची अमेझॉन कंपनी IPLच्याय प्रायोजकत्वासाठी आघाडीवर असल्याचे मानले जाते. भारतीय संघाच्या जर्सीचे प्रायोजक असलेले लर्निंग अॅप बायजूज देखील IPLच्या मिळवण्यासाठीच्या स्पर्धेत आघाडीवर आहे. अमेझॉन आणि बायजूज बरोबर IPLच्या प्रायोजकत्वासाठी स्पर्धेत असलेले तिसरे नाव म्हणजे ड्रीम ११ होय. वाचा- बाजारातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विवोच्या माघारीनंतर आता रिप्लेसमेंट म्हणून येणारी कंपनीकडून विवो इतके मूल्य मिळणार नाही. विवो एका वर्षासाठी ४४० कोटी रुपये देत होते. आता येणाऱ्या कंपन्या १८० कोटी पर्यंत रक्कम देऊ शकेल. वाचा- आयपीएलचे प्रायोजकत्व काढून घेतल्यानंतर आणखी दोन स्पर्धेचे प्रायोजकत्व काढून घेतल्याचे वृत्त आहे. विवोने प्रो कबड्डी लीग आणि टीव्हीवरील शो बिग बॉस चे प्रायोजकत्व काढून घेतले आहे. वाचा-