नवी दिल्ली: सर्वात वेगवान धावपटू () याच्या वाढदिवसाची पार्टी क्रीडा क्षेत्रातील मोठ मोठ्या लोकांना अडचणीत आणणारी ठरण्याची शक्यता आहे. उसेन बोल्टचा वाढदिवस २१ ऑगस्ट रोजी होता. या वाढदिवसासाठी आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत अनेक स्टार खेळाडू आले होते. आता बोल्टची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे या पार्टीत आलेल्या लोकांना देखील याची लागण होण्याची शक्यता आहे. वाचा- बोल्टने आयोजित केलेल्या पार्टीत सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळला नव्हता, इतकच नव्हे तर कोणी मास्क देखील लावले नव्हते. पार्टीत क्रिकेटमधील धडाकेबाज फलंदाज (), फुटबॉलपटू रहीम स्टर्लिंग आणि लियॉन बेली हे देखील उपस्थित होते. वाचा- बोल्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तो आयसोलेशनमध्ये गेला आहे. पार्टी झाल्यानंतर बोल्टने करोनाची चाचणी घेतली होती. बोल्टच्या वाढदिवसाच्या पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. यात सहभागी झालेले त्याचे मित्र डान्स करत होते आणि एकानेही मास्क लावला नव्हता. पार्टानंतर बोल्टने हॅपी बर्थडे एव्हर असे ट्विट केले होते. विशेष म्हणजे ख्रिस गेल आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळतो आणि या वर्षी होणाऱ्या युएईमधील स्पर्धेसाठी तो लवकरच संघात दाखल होण्याची शक्यता आहे. वाचा- पाहा पार्टीचा व्हिडिओ वाचा- जमैकामध्ये आतापर्यंत १ हजार ४१३ करोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १६ जणांचा मृत्यू झालाय. पण गेल्या १४ दिवसात ४१० नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जमैकामध्ये करोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता वाटत आहे. उसेन बोल्टने ऑलिम्पिक स्पर्धेत ८ सुवर्णपदकं मिळवली आहेत. १०० मीटर आणि २०० मीटर अंतर सर्वात वेगाने धावण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. बोल्टने १०० मीटर अंतर ९.५८ सेकंदात तर २०० मीटर अंतर १९.१९ सेकंदात पार केले होते.