नवी दिल्ली: (PM Modi Writes Letter To Suresh)भारताचा माजी कर्णधार याने १५ ऑगस्ट रोजी सोशल मीडियावरून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर अवघ्या १५ मिनिटात सुरेश रैनाने देखील निवृत्ती जाहीर केली होती. धोनीच्या निवृत्तीच्या बातमी पाठोपाठ रैनाची निवृत्ती हा चर्चेचा विषय ठरला होता. वाचा- धोनीच्या योगदानाप्रमाणेच सर्व जण रैनाचे आभार आणि शुभेच्छा देत आहेत. काल पंतप्रधान यांनी धोनीला शुभेच्छा देणारे पत्र पाठवले होते. तसेच पत्र मोदींनी रैनाला देखील पाठवले आहे. धोनीने वयाच्या ३९व्या वर्षी निवृत्ती घेतली. तर रैनाने ३३व्या वर्षी घेतलेल्या निवृत्तीने क्रिकेट जगत हैराण झाले होते. वाचा- रैनाने इतक्या लवकर घेतलेल्या निवृत्तीवर पंतप्रधान मोदींनी लक्ष वेधले. ते म्हणाले, तुम्ही इतके युवा आहेत आणि तरी निवृत्ती कशी काय घेतली. १५ ऑगस्ट रोजी तुम्ही आयुष्यातील सर्वात अवघड असा निर्णय घेतला. मी यासाठी निवृत्ती हा शब्द वापरणार नाही. निवृत्त होण्यासाठी तुम्ही अजून लहान आहात आणि तुमच्यात भरपूर ऊर्जा आहे. क्रिकेटच्या मैदानावरील एक शानदार प्रवासानंतर आता आयुष्यातील नव्या डावाला सुरूवात करत आहात. वाचा- फक्त एक फलंदाज म्हणून नव्हे तर एक गोलंदाज म्हणून तुम्ही दिलेली योगदान विसरता येणार नाही. तुम्ही एक अशा प्रकारचे गोलंदाज होता. ज्यावर कर्णधार विश्वास ठेवू शकतो. तुमची फिल्डिंग सर्वोत्तम अशी होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कॅचवर तुमची छाप आहे. तुम्ही वाचवलेल्या धावांचा हिशोब लावायचा झाला तर अनेक दिवस लागतील. वाचा- खेळाडूचे कौतुक मैदानात आणि मैदानाबाहेर देखील होते. करिअरमध्ये अनेक वेळा दुखापती आणि अन्य अडचणींचा सामना केल्यानंतर देखील तुम्ही त्यावर मात केली. तुम्ही नेहमी टीम स्पिरीटसोबत चालला. वैयक्तीक विक्रमासाठी नाही तर टीम आणि भारताच्या गौरवासाठी खेळला. आम्ही नेहमी पाहिले आहे की विरोधी संघाची विकेट पडल्यानंतर तुमचा जल्लोष वेगळाच असायचा. वाचा- फक्त क्रिकेटच नाही तर समाज सेवेत तुम्ही मोठे योगदान दिले आहे. महिला सशक्तीकरण, स्वच्छ भारत अभियान, गरजू लोकांना मदत करण्यासाठी तुम्ही नेहमी पुढाकार घेतला. भारताला क्रीडा क्षेत्रात लिडर करण्यासाठी तुम्ही जे केले त्यासाठी आभारी आहोत, असे पंतप्रधान मोदींनी पत्रात म्हटले. रैनाने सोशल मीडियावरून मानले आभार पंतप्रधान मोदींनी लिहलेले पत्र सुरैश रैनाने सोशळ मीडियावर शेअर करत त्यांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी आभार मानले आहेत. देशासाठी खेळत असताना आम्ही खुप मेहनत घेतो. या देशातील लोकांच्या प्रेमापेक्षा दुसरी कोणतीही प्रेरणा नाही. जेव्हा देशाचे पंतप्रधान तुमच्यासाठी अस बोलतात ती गोष्ट फार मोठी असते. मोदीजी प्रेरणा देणारे शब्ध आणि शुभेच्छा यासाठी धन्यवाद. मनापासून त्याचा स्विकार करतो. जय हिंद!