भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, आठ जणांचा मृत्यू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, September 21, 2020

भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, आठ जणांचा मृत्यू

https://ift.tt/3mOr0Cm
ठाणे : भिवंडीत तीन मजली असून त्या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मदतीसाठी धावलेल्या स्थानिकांनी इमारतीच्या ढिगाऱ्याखालून २० जणांना सुखरूप बाहेर काढलं आहे. अजूनही ढिगाऱ्याखाली २० ते २५ जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठाणे महानगरपालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीतून काही जणांना बाहेर काढण्यात यश आलंय. 'एनडीआरएफ'चं पथक घटनास्थळी पोहोचलं असून मदत व बचावकार्य युद्धपातळीवर हाती घेण्यात आलं आहे. मुंबईकच्या नजिक असलेल्या भिवंडीत धामनकर नाक्याजवळच्या पटेल कम्पाऊंड भागात ही घटना घडलीय. 'जिलानी' नावाची ही इमारत सोमवारी पहाटे ३.४० मिनिटांनी कोसळल्याचं समजतंय. स्थानिक रहिवासी आणि अग्निशमन दलाचे जवानांकडून बचावासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सदर इमारत ४३ वर्ष जुनी आहे. सदर इमारती मध्ये ४० फ्लॅट्स असून एकूण १५० रहिवाशी वास्तव्यास होते. सदर घटनेत २५ ते ३० व्यक्ती ढिगाऱ्याखाली अडकल्या असून आतापर्यंत २० जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून आठ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. निजामपूर शहर महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, सदर इमारत समावेश धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये नव्हता. बचावकार्यासाठी घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दल, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे १५ जवान तसंच राष्ट्रीय आपत्ती दलाची एक तुकडी (३० जवान) उपस्थित असून बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. वाचा : वाचा :