'दोन राजकीय नेते दोन तास चहा-बिस्किटावर बोलतील का?' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, September 29, 2020

'दोन राजकीय नेते दोन तास चहा-बिस्किटावर बोलतील का?'

https://ift.tt/2Gio7sI
मुंबई: 'दोन वेगवेगळ्या पक्षांचे मोठे नेते एकमेकांना भेटत असतील, दोन-अडीच तास बोलत असतील तर ते चहा-बिस्किटावर नक्कीच बोलणार नाहीत. त्यात राजकीय चर्चा होणारच,' असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी म्हटलं आहे. पाटील यांच्या या वक्तव्यामुळं फडणवीस-राऊत भेटीचे गूढ आणखी वाढलं आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत व विरोधी पक्षनेते मुंबईतील एका हॉटेलात भेटले. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली. सध्या एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी असलेल्या पक्षाच्या नेत्यांच्या भेटीमुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या भेटीबद्दल वेगवेगळे तर्क मांडले जात आहेत. ही भेट राजकीय नव्हती. 'सामना'साठी घ्यावयाच्या मुलाखतीबाबत होती, असा खुलासा राऊत यांनी केला आहे, तर फडणवीसांनी यातून राजकीय अर्थ काढण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. असं असलं तरी या भेटीची चर्चा थांबण्यास तयार नाही. त्यातच सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळं पुन्हा एकदा चर्चेला जोर आला आहे. वाचा: मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. संजय राऊत व फडणवीसांच्या भेटीत राजकीय विषय निश्चितच होते. पण त्यातून कुठलाही निष्कर्ष निघालेला नाही,' असं पाटील यांनी सांगितलं. राज्यात वेगळी राजकीय समीकरणं जुळण्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखवली. 'करोनामुळं सध्या संकटाची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत कुणालाही निवडणुका नको आहेत. त्यावर अन्य पर्यायही समोर येऊ शकतो,' असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं. यापुढं भाजप राज्यातील सर्व निवडणुका स्वबळावर लढेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.