
अयोध्या: उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीदीचा विध्वंस (Babri Masjid Demolition) प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालय आज आपला निकाल जाहीर करणार आहे. यासाठी सीबीआय न्यायालयाने एका आदेशाद्वारे सर्व आरोपींना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. या प्रकरणात एकूण ४९ आरोपी आहेत. या आरोपींविरोधात सुनावणी झाली. या ४९ आरोपींपैकी एकूण १७ आरोपींचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारतीसारखे मोठे नेते आरोपी आहेत. अशा हाय प्रोफाईल प्रकरणावर आज निकाल येत असल्यामुळे लखनऊमध्ये चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने सर्व पक्षांचे म्हणणे ऐकले. तसेच साक्षी तपासल्या. त्यानंतर १ सप्टेंबरला या प्रकणावरील सुनावणी पूर्ण केली. त्यानंतर २ सप्टेंबर पासून निकालाचे लिखाण सुरू केले. विध्वंस प्रकरणातील ३२ आरोपी
- लालकृष्ण आडवाणी
- मुरली मनोहर जोशी
- महंत नृत्यगोपाल दास
- कल्याण सिंह
- उमा भारती
- विनय कटियार
- साध्वी ऋतंभरा
- रामविलास वेदांती
- धरम दास
- सतीश प्रधान
- चंपत राय
- पवनकुमार पांडेय
- ब्रजभूषण सिंह
- जयभगवान गोयल
- महाराज स्वामी साक्षी
- रामचंद्र खत्री
- अमननाथ गोयल
- संतोष दुबे
- प्रकाश शर्मा
- जयभान सिंह पवेया
- विनय कुमार राय
- लल्लू सिंह
- ओमप्रकाश पांडेय
- कमलेश त्रिपाठी उर्फ सती दुबे
- गांधी यादव
- धर्मेंद्रसिंह गुर्जर
- रामजी गुप्ता
- विजयबहादुर सिंह
- नवीनभाई शुक्ला
- आचार्य धर्मेंद्र देव
- सुधीर कक्कड
- रविंद्रनाथ श्रीवास्तव
- अशोक सिंघल
- गिरिराज किशोर
- बाळासाहेब ठाकरे
- विष्णु हरी डालमिया
- मोरेश्वर सावे
- महंत अवैद्यनाथ
- विनोदकुमार वत्स
- रामनारायण दास
- लक्ष्मीनारायण दास महात्यागी
- हरगोविंद सिंह
- रमेशप्रताप सिंह
- देवेंद्रबहादुर राय
- महामंडलेश्वर जगदीश मुनी महाराज
- बैकुंठलाल शर्मा
- विजयराजे शिंदे
- परमहंस रामचंद्र दास
- डॉक्टर सतीशकुमार नागर