
: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका नवजात चिमुरडीवर क्रूर आणि बिभत्स अत्याचार करण्यात आल्याचं समोर आलंय. अवघ्या दोन दिवसांपूर्वी या चिमुरडीनं जन्म घेतला होता. अज्ञात आरोपीनं या चिमुरडीच्या शरीरात जवळपास १०० वेळा स्क्रू ड्रायव्हर खुपसून तिची हत्या केल्याचं समोर आल्यानंतर सगळ्यांच्याच अंगाचा थरकाप उडाला. भयंकर म्हणजे, राजधानी भोपाळमध्ये गेल्या १५ दिवसांत नवजात मुलीच्या हत्येचं हे तिसरं प्रकरण उघडकीस आलंय. आरोपीनं दोन दिवसांच्या मुलीवर स्क्रू ड्रायव्हरनं वार करत तिला ठार केलं. त्यानंतर एका शालीत गुंडाळून एका मंदिराच्या परिसरात फेकून तो निघून गेला. वाचा : वाचा : वाचा : अयोध्या नगर परिसरात या चिमुरडीचा मृतदेह आढळून आला. स्टेशन प्रभारी रेणू मुराब यांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ सप्टेंबर रोजी सकाळी मुलीचा मृतदेह सापडला होता. पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले तेव्हा त्यांनाही मोठा धक्का बसला. कुणीतरी मुलीला टाकून निघून गेलं असेल आणि त्यानंतर एखाद्या हिंस्र प्राण्यानं चिमुरडीच्या शरीरावर हल्ला केला असेल, असं अगोदर पोलिसांना वाटत होतं. परंतु, पोस्टमॉर्टेम अहवाल हातात आल्यानंतर पोलिसही चक्रावून गेला. नवजात मुलीच्या शरीरात १०० हून अधिक वेळा हत्यार खुपसण्यात आलं होतं. स्क्रू ड्रायव्हरनं तिच्या शरीरावर वार करण्यात आल्याचं आढळलं. ही मुलगी कोण आहे, याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून कारवाईला सुरूवात केलीय. आरोपीचा माग काढण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेजची मदत घेत आहेत. वाचा : वाचा :