एकाच डोसमध्ये करोनाचा खात्मा! 'या' लशीची अंतिम टप्प्यातील चाचणी सुरू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, September 24, 2020

एकाच डोसमध्ये करोनाचा खात्मा! 'या' लशीची अंतिम टप्प्यातील चाचणी सुरू

https://ift.tt/3cr8YB7
वॉशिंग्टन: करोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. तर दुसरीकडे करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. करोनाच्या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी लस विकसित करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. आता आणखी एक लस चाचणीच्या अंतिम टप्प्यात दाखल झाली आहे. अमेरिकन कंपनी जॉन्सन अॅण्ड जॉन्सनने चाचणी अंतिम टप्प्यात सुरू झाली आहे. फक्त एकाच डोसमध्ये करोनाचा खात्मा होऊ शकतो असा दावा कंपनीने केला आहे. सध्या सुरू चाचणीत लशीचे दोन डोस द्यावे लागतात. त्यानंतर करोनाविरोधात लढण्यासाठी अधिक प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. ६० हजारजणांवर चाचणी करोनाला अटकाव करणाऱ्या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू झाली आहे. करोनावर मात करण्यासाठी लशीचा एकच डोस पुरेसा आहे का, याचाही अभ्यास करण्यात येणार आहे. याआधीच्या टप्प्यातील चाचणीत सकारात्मक परिणाम आले होते. एकाच डोसमध्ये करोनाला अटकाव करणे शक्य झाल्यास हे मोठे यश समजले जाईल. अंतिम टप्प्यात ६० हजारजणांवर चाचणी होणार असल्याचे जॉन्सन अॅण्ड जॉन्सनने स्पष्ट केले आहे. ही चाचणी अमेरिका, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, चिली, कोलंबिया, मेक्सिको आणि पेरू आदी देशांमध्ये होणार आहे. आतापर्यंत सुरू असलेल्या चाचणीपैकी ही सर्वात मोठी चाचणी आहे. वाचा: वाचा: हा होणार फायदा जॉन्सन अॅण्ड जॉन्सनची लस इतरांच्या तुलनेत मागे असले तरी या लशीचा फायदा आहे. ही लस शून्य तापमानात ठेवण्याची आवश्यकता नाही. त्याशिवाय दोनऐवजी एकाच डोसमध्ये रोगप्रतिकारक शक्ती विकसित केली जाऊ शकते. या वर्षाअखेरपर्यंत लस किती सुरक्षित आणि प्रभावी आहे याची माहिती समोर येणार असल्याचे कंपनीचे मुख्य वैज्ञानिक अधिकारी डॉ. पॉल स्टॉफल यांनी सांगितले. वाचा: वाचा: या लशींकडेही लक्ष अमेरिकेत करोनाच्या संसर्गाने थैमान घातले आहे. अशातच अमेरिकेतील काही कंपन्यांनी लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. याला अमेरिकन सरकारनेही आर्थिक पाठबळ दिले आहे. मॉडर्ना, फायजर या कंपन्यांच्या लशीची अंतिम टप्प्यातील लस चाचणी सुरू झाली आहे. फायजर आणि मॉडर्नाची लस या वर्षाखेर उपलब्ध होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.